Pune crime | पुणे पोलिसात खळबळ ! फरासखाना पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यानेच दिली दत्तवाडीतील पोलिसाच्या गेमची सुपारी ; वाचा संपूर्ण घटना

आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. योगेश खुनाच्या आरोपाखाली अटक होता नुकताच गुन्ह्यातून पॅरोलवर बाहेर आला होता. या प्रकरणी फरासखाना पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ यांच्यावर हत्येच्या कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन दुधाळ यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीसचे कर्मचारी दिनेश दोरगे यांच्या हत्येची सुपारी दिली होती.

Pune crime | पुणे पोलिसात खळबळ ! फरासखाना पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यानेच दिली दत्तवाडीतील पोलिसाच्या गेमची सुपारी ; वाचा संपूर्ण घटना
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 12:54 PM

पुणे- शहर पोलीस दलात खळबळ निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे. फरासखाना पोलीस स्थानकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी दत्तवाडी पोलीस स्थानकातील दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. सराईत गुन्हेगाराच्या मोबाईल तपासणी करता असताना ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.

तर झालं असं की दत्तवाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार योगेश प्रल्हाद अडसूळ याला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे तपास करत असताना पोलिसांनी त्याच्या मोबाईलही तपासाला त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येच्या कटाचा उलगडा झाला. फारसखाना पोलीस दलातील ज्या पोलीस कर्मचाऱ्याने हत्येची सुपारी दिली होती, पोलिस कर्मचारी व आरोपीमध्ये झालेले डील समोर आले आहे. वेळीच घटनेचा उलगडा झाल्याने हत्येचा कट उधळण्यात आला आहे.

आरोपी खुनाच्या गुन्ह्याखाली अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. योगेश खुनाच्या आरोपाखाली अटक होता नुकताच गुन्ह्यातून पॅरोलवर बाहेर आला होता. या प्रकरणी फरासखाना पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ यांच्यावर हत्येच्या कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन दुधाळ यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीसचे कर्मचारी दिनेश दोरगे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. जेव्हा दोरगे यांची हत्या केल्यानंतर पुढील सर्व गोष्टी पाहून घेण्याची हमी दिली होती. हडपसर येथे भेट घेत दुधाळ याने ही सुपारी दिली होती. याबाबत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील बाळासाहेब थोरात यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Remedies of Kapoor | घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कापराचे उपाय नक्की करा

Sahitya Sammelan | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे बिनविरोध

मेट्रो कारशेडमध्ये लोखंडी गज उतरवताना अपघात, पिंपरीत 27 वर्षीय कामगाराचा मृत्यू

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.