जनावरांच्या खाद्यासोबत कोट्यवधींच्या विदेशी मद्याची तस्करी, आतापर्यंतची मोठी कारवाई करत…

Pune Crime News | विदेशी मद्याच्या तस्करीचे अनेक प्रकरणे उघड होत असतात. आता पुणे शहरात कोट्यवधींच्या मद्याच्या तस्करीचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जनावरांच्या खाद्यासोबत विदेशी मद्याची तस्करी होत होती.

जनावरांच्या खाद्यासोबत कोट्यवधींच्या विदेशी मद्याची तस्करी, आतापर्यंतची मोठी कारवाई करत...
Liquor
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 5:40 PM

योगेश बोरसे, पुणे | 2 नोव्हेंबर 2023 : विदेशी मद्याची तस्करीचे प्रकरणे राज्यात अधूनमधून उघड होत असतात. आता पुणे शहरांत विदेशी मद्याच्या तस्करीचे मोठे प्रकरण उघड झाले आहे. मद्य तस्कर जनावरांच्या खाद्यासोबत विदेशी मद्याची तस्करी करत होते. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर मुंबई बंगलोर महामार्गावर रावेत या ठिकाणी सापळा रचून हा मद्य साठा जप्त करण्यात आला. हे मद्यगोवामध्ये तयार केले गेले होते. तसेच ते मुंबईकडे घेऊन जात होते. उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत सर्व साठा जप्त केला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली.

कशी केली कारवाई

बेंगळुरू-मुंबई महामार्गावर विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रावेत गावच्या हद्दीत सापळा रचला. पथकाने महामार्गावरुन जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी सुरु केली. एक १४ चाकी वाहन जात असताना त्याला अडवले. त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात जनावराचे खाद्य असलेली पोती होती. या पोत्यांमध्ये काय आहे? अशी विचारणा केली असताना आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानंतर पथकाने स्वत: तपासणी केल्यावर विदेशी मद्याची खोकी आढळून आली.

हे सुद्धा वाचा

किती साठा केला जप्त

मुंबई, बंगलोर महामार्गावर विदेशी मद्य असणाऱ्या १२५७ बॉक्स त्या ट्रकमध्ये सापडले. एकूण ४० हजारांपेक्षा जास्त मद्याच्या बाटल्या त्यात होत्या. त्याची किंमत साधरण १ कोटी १९ लाख रुपये आहे. हा सर्व साठा वसई, विरारला जाणार आहे. या प्रकरणामध्ये विजय चंद्रकांत चव्हाण (वय ५३, रा. सातारा) आणि सचिन निवास धोत्रे (वय ३१ रा. सांगली) या आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपींना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.