Pune crime| हुंडा म्हणून बुलेट गाडीची मागणी करत विवाहितेचा केला छळ ; नऊजणा विरोधात गुन्हा दाखल
लग्नानंतर बुलेटसाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्याची मागणी केली. मात्र विवाहितेने या गोष्टीला नकार देताच सासरच्या लोकांनी तिला डांबून ठेवत तिला मारहाण केली इतकंच नव्हेत तर जोपर्यंत पैसे आणत नाही तोपर्यंत नवऱ्यासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही असे बजावले.
पुणे – शहरात हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक छळ करत शारीरिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. माहेरहून बुलेट गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये आणण्यासाठी नवऱ्याने विवाहितेचा छळ करत तिला शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी पती व सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले पीडित विवाहितेचे लग्न पिंपळगाव, नाशिक येथे किशोर दशरथ मोहिते (वय २५) यांच्या सोबत झाले होते.लग्नानंतर बुलेटसाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्याची मागणी केली. मात्र विवाहितेने या गोष्टीला नकार देताच सासरच्या लोकांनी तिला डांबून ठेवत तिला मारहाण केली इतकंच नव्हेत तर जोपर्यंत पैसे आणत नाही तोपर्यंत नवऱ्यासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही असे बजावले. याप्रकरणी पोलिसांनी किशोर दशरथ मोहिते (वय २५), दीर ईश्वर दशरथ मोहिते (वय ३०), दीर ज्ञानेश्वर दशरथ मोहिते (वय ३३), दीर संजय दशरथ मोहिते (वय ३५), सासरे दशरथ मोहिते (वय ६०) यांच्यासह सासू आणि तीन जाऊ अशा नऊ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शिवीगाळ करत केली मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा पती आरोपी किशोर मोहिते याला नवीन बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी आरोपींनी केली. फिर्यादी विवाहितेने माहेरून पैसे आणले नाहीत. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ व हाताने मारहाण केली.
नवाबभाईंचं तर काहीतरी वेगळंच असतं, ते ऐकतंच नाही – अजित पवार
लसीचे दोन डोस घ्या, नाही तर कारवाई करू; केडीएमसीचा दुकानदार, व्यापाऱ्यांना ‘डोस’