AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा ; नगरसेवक पद अबाधित

नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचा एडिसन लाईफ सायन्स कंपनीशी संबंध आहे. कोरोना काळात पिंपरी - चिंचवड महापालिकेला १० लाखांचे मास्क या एडिसन लाईफ सायन्स कंपनीने पुरविले होते.मात्र नगरसेविका सुलक्षणा शिलवंत - धर यांचे कंपनीसोबत संबंध असल्याने त्याचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केली होती .

राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा ; नगरसेवक पद अबाधित
Corporator Dr. Sulakshana Shilvant-dhar
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 6:58 PM
Share

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत -धर यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचे पद रद्द करण्याबाबत विभागीय आयुक्तांनी नोंदवलेला निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याबाबतचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी. एस. कुलकर्णी यांनी दिले आहेत. अशी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काय होता आरोप

नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचा एडिसन लाईफ सायन्स कंपनीशी संबंध आहे. कोरोना काळात पिंपरी – चिंचवड महापालिकेला १० लाखांचे मास्क या एडिसन लाईफ सायन्स कंपनीने पुरविले होते.मात्र नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांचे कंपनीसोबत संबंध असल्याने त्याचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केली होती .

या प्रकरणात विभागीय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली . चौकशीअंती निष्कर्ष नोंदवला होता . सुलक्षणा शिलवत धर या महापालिका सदस्य म्हणून पदावर राहण्यासपात्र नाहीत. त्यांना अपात्र करावे असा स्पष्ट निष्कर्ष विभागीय आयुक्त यांनी दिला होत. मात्र , पद रद्द करण्याबाबत कोणताही आदेश अद्याप महापालिका प्रशासनाला प्राप्त झाला नव्हता . त्यामुळे सुलक्षणा शिलवंत धर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायालयाने दिले हे आदेश 

दरम्यान , ६ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात न्यायाधीश जी. एस. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली होती . त्यानंतर पुन्हा २१ डिसेंबर रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीमध्ये तक्रारकर्त्यांच्या वकिलांनी हे मान्य केले , की विभागीय आयुक्तांनी दिलेला चुकीचा आदेश अधिकार क्षेत्र आणि अधिकाराशिवाय होता. या प्रकरणात नगरसेवक पद रद्द करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार नाहीत, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला . त्यामुळे सुलक्षणा शिलवंत – धर यांचे पद कायम राहिले आहे.

सुलक्षणा शिलवंत काय म्हणाल्या ? वास्तविक पाहता एडिसन लाइफ सायन्स ही माझ्या भावाची कंपनी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे . मात्र महापालिकेशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार केलेला नव्हता व तो जाणीवपूर्वक टाळला होता . आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वत्र लॉकडाऊन असताना कुठेही मास्क उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी केलेल्या विनंतीवरून व त्यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार चांगल्या प्रतीचे मास्क माझ्या भावाच्या कंपनीने पुरवले होते . मात्र कंपनीचा वास्तविक पाहता माझ्याशी कोणताही संबंध नाही . मात्र बॅलन्स शीट दाखवून मला या प्रकरणात गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. ही सर्व सत्य परिस्थिती माननीय महापालिका आयुक्तांनी माननीय विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. तरी देखील, अशा प्रकारचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी का नोंदवला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री SMS, Jio आणि VI चे सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्स सादर

Jitendra Awhad | आपले वडील आजारी असताना आपण चर्चा करतो का? जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांना सवाल

डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री SMS, Jio आणि VI चे सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्स सादर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.