कात्रज परिसरात कंटेनर-कारचा भीषण अपघात; अपघातात एक जण ठार

कात्रज परिसरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. कंटेनर आणि कारचा अपघात झाला, त्यानंतर याच कंटेनरची धडक बाजूने जाणाऱ्या दुचाकीला देखील बसली.

कात्रज परिसरात कंटेनर-कारचा भीषण अपघात; अपघातात एक जण ठार
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 11:53 PM

पुणे : कात्रज परिसरात भीषण अपघात (Pune Accident) घडला आहे. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. कंटेनर ( Container) आणि कारचा (Four Wheeler) अपघात झाला आहे. मात्र त्यानंतर याच कंटेनरची धडक बाजूने जाणाऱ्या दुचाकीला देखील बसली. या दुचाकीवरून दोन प्रवासी प्रवस करत होते. या तीन वाहनाच्या विचित्र अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मृताची अद्याप ओळख पटू शकलेली नाहीये. कात्रजच्या नवीन बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर लागणाऱ्या जांभूळवाडी दारीपुलाजवळच हा भीषण अपघात घडला आहे. अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून कंटेनरसह पळ काढला. आज रात्री अंदाजे  9 च्या सुमारास हा अपघात घडला आहे.

अपघाताचे कारण अस्पष्ट

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कात्रजच्या नवीन बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर लागणाऱ्या जांभूळवाडी दारीपुलाच्या जवळच हा भीषण अपघात घडला आहे. सुरुवातीला कंटेनर आणि चारचाकीची धडक झाली मात्र त्यानंतर हा कंटनेर बाजून जाणाऱ्या दुचाकीला देखील धडकला. अपघातानंतर कंटेनर चालकाने कंटेनरसह घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय. मृताची ओळख अद्याप समोर येऊ शकलेली नाही. तसेच अपघाताचे कारण देखील अस्पष्ट आहे.

वाहनांचे नुकसान

या अपघातामध्ये वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात चारचाकीचा तर चुराडा झालाय. चारचाकी पूर्ण डॅमेज झाली आहे. तर दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात एक जण जागीच ठार झाला. अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

संबंधित बातम्या

Mumbai Crime : मुंबई गुन्हे शाखेकडून सात कोटींच्या बनावट नोटा जप्त, सात आरोपींना अटक

Jharkhand Crime : ये दोस्ती हम नही छोडेंगे… सोबतच गुणगुणायचे, आयुष्यही एकत्रच संपवलं; जगावेगळ्या मैत्रीचा असा झाला करूण अंत

Delhi Crime : आजारी आईसाठी मदत मागायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.