Pune crime | विवाहबाह्य संबंधाचं झेंगाट, बायकोचा राग अनावर, नातेवाईकांच्या हाती स्टंप, शेवटी जे घडलं त्यानं पुणं हादरलं
ताजुद्दीन पठाण हे बांधकाम व्यावसायिक होते. त्यांच्या कामावर काम करणारी महिला आणि त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. मृत व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगा मागील आठ महिन्यांपासून वेगळे राहत होते.
पुणे – शहरातील वानवडी परिसरात पत्नी व तिच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले अनैतिक संबधाचा राग पत्नीच्या मनात होता, यातूनच मारहाणीची घटना घडली आहे.
अशी घडली घटना
मृत ताजुद्दीन पठाण (वय ५३, हडपसर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ताजुद्दीन पठाण हे बांधकाम व्यावसायिक होते. त्यांच्या कामावर काम करणारी महिला आणि त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. मृत व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगा मागील आठ महिन्यांपासून वेगळे राहत होते. घटनेच्या दिवशी आरोपी महिलेने ताजुद्दीन यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर तिचा नातेवाईक राज पाटील याने स्टंपने मारहाण केली. यात ताजुद्दीन गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिददीक कासीम शेख यांनी वानवडी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. वानवडी पोलिसांनी पत्नीसह अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
खून करुन पळालेल्या आरोपीला अटक दुसरीकडं पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुरू केलेल्या आरोपी दत्तक योजनेचा फायदा पोलिसांना होत आहे. एका दत्तक आरोपीने बीड मध्ये पूर्ववैमनस्यातून मुस्तफा शिकीलकर या व्यक्तीचा खून करून पळालेला आरोपी आपल्या हद्दीत आला असल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून त्या आरोपीला अटक केली. सुरज उर्फ गांधी भागीरथ मिश्रा अस अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याच्या आई आणि वडिलांसोबत मिळून एका व्यक्तीचा खून केला आहे. त्यानंतर तो बीड येथून पळून पुनावळे गावठाण येथे त्याच्या बहिणीकडे आला होता. मात्र तो पुनावळे गावठाण इथे आल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आलीय.