Manorama Khedkar : IAS पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक, चार पथकांकडून सुरु होता शोध

ias pooja khedkar:वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधात होते. रायगड जिल्ह्यातील एका फार्म हाऊस त्या लपल्या होत्या.

Manorama Khedkar : IAS पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक, चार पथकांकडून सुरु होता शोध
pooja khedkar mother manorama
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 11:07 AM

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधात होते. रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर महाडमधील हिरकणवाडी येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. हिरकणवाडीच्या हॉटेल पार्वतीमधून त्यांना अटक केली गेली. पुणे पौड पोलीस त्यांना घेऊन पुण्याकडे निघाले आहेत. त्यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या. पूजा खेडकर यांचेही प्रशिक्षण थांबवून त्यांना मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री नॅशनल एकेडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशनमध्ये तातडीने परत बोलवले आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गुन्हा दाखल

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचे संपूर्ण कुटुंबच वादात आले आहे. पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाल्यानंतर त्यांच्या आई अन् वडिलांचे कारनामे समोर आले. पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या. त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची चार पथके रवाना झाली होती. या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि इतरांवर शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय होते प्रकरण

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर वादाची जमीन खरेदी घेतली होती. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर अन् गुंड घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले होते. वर्षभरापूर्वीच्या या प्रकाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल झाला.

हे सुद्धा वाचा

पुणे पोलिसांना अखेर मनोरमा खेडकरला यांचा शोध लागला. पौड पोलिसांच्या पथकाने रायगडमधून त्यांना अटक केली. तसेच पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात 307 हे कलम वाढवण्यात आले आहे. रायगडमधून पोलीस मनोरमा खेडकर हिला घेऊन निघाले आहेत. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर फरार झाले होते. त्यांचा शोध सुरु आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.