Accident | 48 तासांत रस्ते अपघातात तब्बल 16 मृत्यू, वर्ध्यापाठोपाठ मुंबई-पुणे जुन्या हायेववरही अपघात!
Mumbai-Goa Old Highway Accident : गेल्या 2 दिवसांत राज्यातील वाढत्या रस्ते अपघाताच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या कंटेनर अपघातग्रस्त (Container Accident) झाला आहे.
रायगड : राज्यातील अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहे. सोमवारी रात्री झालेल्या अपघातात वर्ध्यातील मेडिकल कॉलेजमधील सात विद्यार्थ्यांचा (7 Medical Students Killed in Wardha Accident) मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे आता इथं मुंबई-पुणे मार्गावरही (Mumbai-Pune Old Hoghway) कंटनेरचा अपघात झाला आहे. या अपघातत कंटेरन चालकाला तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गेल्या दोन दिवसांत राज्यातील वाढत्या रस्ते अपघाताच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या कंटेनर दस्तुरीजवळ अपघातग्रस्त (Container Accident) झाला आहे. चालक या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. सुदैवानं कंटेनर पलटी झाला तेव्हा आजूबाजूला कोणतंही वाहन नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय. या अपघातामुळे रस्ते अपघातांची राज्यातील मालिका थांबायचं नाव घेत नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.
2 दिवसांपासून अपघातांची मालिका
सोमवारपासून सुरु झालेली अपघातांची मालिका अजूनही सुरुच आहेत. सोमवारी पुणे-नगर मार्गावर एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा जीव गेला होता. तर दुसरीकडे परभणीत ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तिघा भावंडांचा बळी गेला होता. खड्डा चुकवण्याच्या नादात खडलेल्या या अपघातातील तीन भावंडांपैकी दोघे सख्खे भाऊ दगावले होते. अशातच मंगळवारी पहाटेच्या सुमारास वर्धा जिल्ह्यात घडलेल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या कार अपघातात सात विद्यार्थ्यांवर काळानं घाला घातला आहे.
पंतप्रधान @narendramodi यांनी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून सेलूसरा जवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
— PMO India (@PMOIndia) January 25, 2022
पुणे नाशिक मार्गावरही अपघात
दरम्यान, पुणे नाशिक महामार्गावर चौदावर एका वेडसर महिलेचा मृतदेह आढळून आला असून एका अज्ञात वाहनाच्या धडकेत या महिलेचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना या महिलेचा मृतदेह हा छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. नारायणगाव पोलीसानी हा मृतदेह पहाटेच्या दरम्यान शवविच्छेदनासाठी पाठवला होता. ही घटना रात्रीच्या दरम्यान घडली. सदरची महिला हि वेडसर असल्याने रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला असल्याचं स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे या घटनेत नारायणगाव पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे.
महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो: पंतप्रधान @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 25, 2022
गेल्या 48 तासांत 16 जणांचा रस्ते अपघातात बळी!
गेल्या 48 तासांत पाचहून अधिक अपघात झाले असल्याचं समोर आलं आहे. यातील तीन अपघात हे मोठे होते. यातील पाच अपघातात मिळून एकूण आतापर्यंत 16 जणांचा जीव गेला आहे. परभणीत तिघे भावंड, नगर-पुणे हायवेवरील अपघातात पाच जण, वर्ध्यातील अपघातात सात तर पुणे-नाशिक हायवेवरील अपघातात दगावलेल्या एका महिलेसह एकूण 16 जणांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील वाढते रस्ते अपघात यामुळे आता चिंतेचा विषय ठरु लागले आहेत.