Pune : धक्कादायक! पुण्यात वर्षभरात 123 गुन्ह्यात 147 विधिसंघर्षित बालकांचा सहभाग

बालगुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला असून यातील काही बालगुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार बनले आहेत. शिकण्या खेळण्याच्या वयात ही मुले हातात हत्यारे घेऊन फिरताना दिसत आहेत. बालगुन्हेगारीत सहभागी झालेली काही घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे तर काही मुले मौजमजा करण्यासाठई झटपट पैसे कमावण्याचे साधन म्हणून गुन्हेगारीकडे वळतात.

Pune : धक्कादायक! पुण्यात वर्षभरात 123 गुन्ह्यात 147 विधिसंघर्षित बालकांचा सहभाग
लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 6:02 PM

पिंपरी चिंचवड : कौटुंबिक वातावरण, संगत आणि गुन्हेगारीचे आकर्षण यामुळे मिसरूड न फुटलेली लहान मुलं गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत. त्यातच झटपट पैसा मिळवून मौजमजा करण्याची वृत्ती मुलांमध्ये बळावत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षभरात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, वाहन चोरी, चोरी, दरोडा व जबरी चोरी अशा गंभीर 123 गुन्ह्यांमध्ये 147 विधिसंघर्षित बालकांचा सहभाग आढळून आला आहे.

गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण करण्यासाठी मुलांची धरपड

बालगुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला असून यातील काही बालगुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार बनले आहेत. शिकण्या खेळण्याच्या वयात ही मुले हातात हत्यारे घेऊन फिरताना दिसत आहेत. बालगुन्हेगारीत सहभागी झालेली काही घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे तर काही मुले मौजमजा करण्यासाठई झटपट पैसे कमावण्याचे साधन म्हणून गुन्हेगारीकडे वळतात. विशेष म्हणजे गुन्हेगारी विश्वात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी काय करतील याचा नेम राहिला नाही. गुन्हा करताना पकडल्यानंतर आपले नाव व्हावे यासाठी आपण केल्याची कबुलीही हे बाल गुन्हेगार देतात.

विधिसंघर्षित बालकांचा सहभाग असलेले गुन्हे आणि विधिसंघर्षित मुलांची संख्या

खून – 8 (11) खुनाचा प्रयत्न – 15 (30) बलात्कार – 8 (9) वाहन चोरी – 43 (40) 1 मुलगी चोरी – 20 (16) 1 मुलगी दरोडा / जबरी चोरी – 29 (41)

गतवर्षी बलात्काराच्या 164 गुन्ह्यांची नोंद

पुण्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्येही सतत वाढ होताना दिसत आहे. दररोज अनेक महिला, मुली कौटुंबिक अत्याचार, बलात्काराला बळी पडत असल्याचे समोर येत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी पुण्यात 164 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. बहुतांश घटनांमध्ये नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. तसेच विवाहित महिलांच्या कौटुंबिक छळाच्याही घटना उघडकीस आल्या आहेत. कौटुंबिक छळाला कंटाळून अनेक महिलांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊस उचलत आपले जीवन संपवले आहे. (In Pune, 147 children participated in 123 crimes during the year)

इतर बातम्या

Pune Suicide : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या, नैराश्येतून उचलले टोकाचे पाऊल

निवडणूक निकालाधीच काळाचा घाला; उमेदवाराचा अपघातात मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.