Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन कोटींच्या आयफोनची चोरी, पुणे गोडावूनमधून लांबवले, पश्चिम बंगलामध्ये विकले…साखळी होती तरी कशी

Pune Crime News : पुणे शहराजवळ आयफोनच्या चोरीचे मोठे प्रकरण समोर आले आहे. तब्बल दोन कोटी रुपये किंमतीच्या आयफोनची चोरी झाली आहे. या प्रकरणाची संपूर्ण साखळी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे...

दोन कोटींच्या आयफोनची चोरी, पुणे गोडावूनमधून लांबवले, पश्चिम बंगलामध्ये विकले...साखळी होती तरी कशी
iphone
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 2:40 PM

पुणे | 26 ऑगस्ट 2023 : फोनचे आकर्षण सर्वांनाच असते. मग अनेक जण आयफोन घेण्याचा विचार करतात. परंतु आयफोन महाग असल्यामुळे बजेटच्या बाहेर जातात. यामुळे अनेक जण वापरलेले आयफोनसुद्धा विकत घेण्यास तयार असतात. लोकांचे आयफोनसंदर्भातील आकर्षण पाहून एकाने गोडावूनमधून चोरीचा उद्योग सुरु केला. एक, दोन नव्हे त्याने शेकडो आयफोनची चोरी झाली होती. त्या फोनच्या विक्रीसाठी साखळीच तयार करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासादरम्यान अखेर प्रकार उघड झाला.

काय आहे नेमका प्रकार

पुणेजवळ लोणीकंद पोलीस ठाण्याचा हद्दीत हा प्रकार घडला. या भागात असलेल्या केसनंद रोडवर आयफोनचे गोडाऊन आहे. त्या गोडावूनमधून आयफोन मोबाईलची चोरी होऊ लागली होती. पोलिसांकडे तक्रार गेली. मग पोलीस तपासादरम्यान झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील एका टोळीची माहिती मिळाली.

हे सुद्धा वाचा

आरोपीला केली अटक

पोलिसांचे पथकाने साहेबगंज गाठले. त्या ठिकाणी सलीम उर्फ असराइल इस्माईल फजल शेख (35) याला ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी लोणीकंद घेऊन आले. पोलीस ठाण्यात खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने गोदामातून १७ जुलै रोजी अॅपल कंपनीचे २६६ मोबाईल चोरले होते. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. कलम ४५४, ४५७ आणि ३८० अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कुठे करत होता विक्री

आयफोन चोरी ते विक्री एक साखळीच तयार केली गेली. सलीम याने चोरीचे आयफोन विक्रीसाठी पश्चिम बंगालमधील एका एजंटला संपर्क केला. ही साखळी चोरीचे फोन विकू लागली. पोलिसांना आता चोरटा मिळाला असला तरी या प्रकरणातील एजंट आणि इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.