ललित पाटील प्रकरणात ससूनमधील डॉक्टर, कर्मचारी रडारवर, पोलिसांनी सुरु केली…

Lalit Patil Drug Case : पुणे येथील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांवर कारवाई झाली. परंतु आता ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. लवकरच पुणे पोलीस या प्रकरणात मोठा कारवाई करण्याची शक्यता आहे.

ललित पाटील प्रकरणात ससूनमधील डॉक्टर, कर्मचारी रडारवर, पोलिसांनी सुरु केली...
Lalit Patil
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 11:57 AM

पुणे, दि. 23 नोव्हेंबर | पुणे ससून रुग्णालयात घडलेले ड्रग्स प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई झाली. दोन जणांना बडतर्फ करण्यात आले. परंतु या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी दोषी होते. त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. आता पुणे पोलीस अ‍ॅक्सन मोडवर आले आहे. पोलीस चौकशीसाठी ससून रुग्णालयात दाखल झाले आहे. ललित पाटील याच्यावर उपचार करणारे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्यासह ससूनमधील डॉक्टर, एक्सरे तंत्रज्ञ, लेक्चरर यांची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस दलानंतर ससूनमध्ये काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

ललित पाटील पळून गेल्यानंतर उघड झाला प्रकार

ललित पाटील याला ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो तीन वर्षांपासून येरवडा कारागृहात होता. परंतु तीन वर्षातून नऊ महिने त्याने ससूनमध्ये काढले. या ठिकाणी त्याला सर्वसुखसोई मिळत होत्या. तो रुग्णालयातून फरार झाल्यानंतर पुणे पोलिसांवर टीका सुरु झाली. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यामुळे त्याचे एक, एक प्रकरण समोर येऊ लागले. त्याला मदत करणारे सर्वच पोलिसांच्या रडारवर आले.

पोलिसांनी सुरु केली चौकशी

ससूनमध्ये पुणे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. ललित पाटील याच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजीव ठाकूर आणि त्यांच्या पथकातील डॉक्टरांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांपासून गुप्तपणे ही चौकशी सुरु केली आहे. या चौकशीनंतर पोलिसांकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

ससून आणि कारागृह प्रशासनावर शीतयुद्ध

ससूनचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी ललित पाटील याला उपचारासाठी ससून रुग्णालयात ठेवा, असे पत्र दिले होते. त्यानंतर आता कारागृह प्रशासनाने पत्रही व्हायरल झाले आहे. त्यात कारागृह प्रशासनाने ललित पाटील याला उपचारासाठी तुमच्याकडे राहू द्या, असे म्हटले आहे. यावरुन ससून आणि येरवडा प्रशासन यांच्यात मिलीभगत समोर आली आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.