Pune Bhushi Dam : भुशी डॅममध्ये बुडालेल्या मुंबईकर तरुणाचा मृतदेह अखेर हाती! मुसळधार पावसात शिवदुर्ग बचाव पथकाची शोधमोहीम

Lonawana Bhushi Dam : सोमवारीही या तरुणाचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत होतं.

Pune Bhushi Dam : भुशी डॅममध्ये बुडालेल्या मुंबईकर तरुणाचा मृतदेह अखेर हाती! मुसळधार पावसात शिवदुर्ग बचाव पथकाची शोधमोहीम
भुशी धरण...Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 1:07 PM

लोणावळा : पुणे जिल्ह्यातील (Pune District News) लोणावळा येथील भुशी (Bhushi Dam News) धरणात एक तरुण बुडाला (Young boy Drowned) होता. या तरुणाचा मृतदेह अखेर हाती लागला आहे. शिवदुर्ग बचाव पथकानं या बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर शोधण्याचं काम केलं होतं. या पथकाला या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. साहिल सरोज असं मृत तरुणाचं नाव आहे. तो आपल्या इतर मित्रांसोबत भुशी येथे पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि धरणाच्या बॅक वॉटरला आलेला होता. धरणाच्या बॅक वॉटरला धबधब्याखाली ते भिजण्याचा आनंद घेत असताना अचानक साहिलचा पाय घसरला होता आणि तोट थेट भुशी धरणात वाहून गेला होता. साहिल वाहून जातो आहे, हे पाहून त्याच्या मित्रांना त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नव्हतं. काही क्षणात साहिल धरणाच्या पाण्यात वाहून गेला आणि दिसेनासा झाला होता.

भर पावसात शोधमोहीम

दरम्यान, सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी शिवदुर्ग बचाव पथकाला धरणात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पाचारण केलं होतं. सोमवारीही या तरुणाचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत होतं. मात्र या पथकाला सोमवारी मृतदेह शोधण्यता यश आलं नव्हतं. मुसळधार पावसामुळे आणि रात्रीच्या अंधारात अडचणी येत असल्यानं अखेर सोमवारी संध्याकाळी उशिरा बचावकार्य थांबवण्यात आलं होतं.

मंगळवारी पुन्हा एकदा शिवदुर्ग बचाव पथकानं मृतदेह शोधण्यासाठी बचावकार्य सुरु केलं होतं. लोणावळा आणि भुशी डॅम परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मात्र भर पावसताही शिवदुर्ग बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु होतं. अखेर या पथकाला साहिलचा मृतदेह शोधण्यात यश आलं.

हे सुद्धा वाचा

वर्षासहल जीवावर बेतली

साहिल हा मुंबईत राहणारा 19 वर्षीय तरुण होता. तो वर्षा सहलीसाठी मित्रांसोबत भुशी धरण परिसरात गेला होता. साहिलसोबत जवळपास अडीचशे सहकारी बसने वर्षा सहलीसाठी आले असता ही दुर्घटना घडली. धबधब्यावरून तब्बल 25 ते 30 फूट उंचीवरून खाली साहिल वाहत गेला आणि भुशी डॅमच्या बॅकवॉटर बुडाला होता.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.