TET Exam scam | टीईटी परीक्षा घोटाळ्याचे लखनौ कनेक्शन ; दलाल सौरभ त्रिपाठीला अटक, पुण्यात आणून चौकशी होणार – अमिताभ गुप्ता
सौरभ त्रिपाठी हा दलालाची भूमिका पार पडत होता. यामध्ये तो जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक अश्विन कुमार व शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना एकत्र आणण्याची मुख्यभूमिका पार पडत होता. तसेच त्याने विनर नावाची सॉफ्टवेअर कंपनीही सुरु केली होती
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतानाचा दिसून येत आहे.पुणे पोलिसांनी काल 2018 च्या टीईटी परीक्षेतील घोटाळ्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरेला अटक करण्यात आली आहे. तर पुणे सायबर पोलिसांनी या घोटाळ्यात सहभाग असलेल्या सौरभ त्रिपाठीला रात्री उशीरा लखनौ येथून अटक केली आहे.
2018च्या टीईटी परीक्षेत जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक अश्विन कुमार व सुखदेव डेरे यांच्यासोबत सौरभ त्रिपाठी हा ब्रोकर म्हणून काम करायचा. त्यानेच हा सगळा करार घडवून आणला होता. पुणे पोलिसांची टीम त्याच्या मागावर होती. काल रात्री उशीरा त्याला लखनऊ येथे अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणून न्यायालयापुढे सादर केले जाणार आहे. आतापर्यंत पेपर फुटीमधील जी कोअर टीम होती त्यातील सार्वजणांना अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
सौरभ त्रिपाठीची भूमिका काय ?
टीईटी परीक्षेत घोटळा करत असताना सौरभ त्रिपाठी हा दलालाची भूमिका पार पडत होता. यामध्ये तो जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक अश्विन कुमार व शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना एकत्र आणण्याची मुख्यभूमिका पार पडत होता. तसेच त्याने विनर नावाची सॉफ्टवेअर कंपनीही सुरु केली होती. मात्र टीईटी परीक्षेत तो स्वतंत्रपणे सर्व गोष्टी ऑपरेट करत होता. या विनर कंपनीचीही चौकशी केली जाणार आहे.
आणखी बडे दलाल गळाला लागणार
या घोटाळयात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. जसजसा तपास वाढत जाईल तसतशी यामधील दलाल उघड होतील. आमच्याकडे पुरावे आले की आम्ही गुन्हे दाखल करणार अशी माहितीही गुप्ता यांनी दिली आहे.
TET scam 2018 | टीईटी परीक्षा घोटाळा; पुणे पोलिसांनी अटक केले सुखदेव डेरे कोण?