Pune Crime | आरारारारारा खतरनाक…. 92 तलवारी, 9 खंजीर; पिंपरी चिंचवडमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयात पोलिसांनी कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त करण्यात आल्या.
पिंपरी चिंचवड : पोलिसांनी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयात पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात तलवारी (swords) जप्त करण्यात आल्या आहेत. 92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर अशी शस्त्रास्त्र हस्तगत करण्यात आली आहेत. आम्ही 3.7 लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला, हा माल औरंगाबादला पोहोचवला जाणार होता, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांनी दिली. पुण्यात कुरिअरने तलवारी मागण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच ही घटना समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयात पोलिसांनी कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त करण्यात आल्या.
आम्ही 3.7 लाख रुपये किमतीच्या 92 तलवारी, 9 खंजीर आणि 2 कुकरी जप्त केल्या, हा शस्त्रसाठा औरंगाबादला पोहोचवला जाणार होता, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
पाहा एएनआयचे ट्वीट
Maharashtra | Pimpri Chinchwad police seized swords from a courier firm’s office in Dighi area
We’ve recovered 92 swords, 2 kukris & 9 scabbards worth Rs 3.7 lakhs. The consignment was supposed to be delivered to Aurangabad: Krishna Prakash, Pimpri Chinchwad Police commissioner pic.twitter.com/jo9tlZ5tPm
— ANI (@ANI) April 4, 2022
पुण्यात कुरिअरने तलवारी मागण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच ही घटना समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पंजाबमधील लुधियानावरून कुरिअरने आणलेल्या काही तलवारी गेल्या आठवड्यात स्वारगेट पोलिसांनी ही कारवाई केली होती.
पुण्यात हिंसाचाराच्या वाढत्या घटना
गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात हिंसक प्रकार वाढताना दिसत आहेत. पुणे-पिंपरी चिंचवड शहरात गुंडांनी तलवारी नाचवल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे तलवारी मागवण्याचा किंवा पाठवण्याचा उद्देश काय होता? हे शोधणं पोलिसांसमोरील आव्हान ठरत आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात पुन्हा तलवारी जप्त, कुरिअरद्वारे कोणत्या टोळीने मागवल्या तलवारी?
Aurangabad | DTDC कुरिअरमार्फत शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला
हळदीला तलवारींसह डान्स, ‘लग्नाच्या बेड्या’ पडता-पडता नवरदेवाला पोलिसांच्या बेड्या