CCTV | जुन्या भांडणातून तरुणावर गोळीबार, गोळी चुकवल्याने तरुण बचावला, पुण्यातील बिबवेवाडीत थरार

बिबवेवाडीतील शिवशंकर सोसायटी समोर तक्रारदार, त्याचा भाऊ आणि इतर मित्र हे रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गप्पा मारत उभे होते. त्यावेळी चार फेब्रुवारीला झालेल्या भांडणावरुन आरोपी आणि इतर आठ ते दहा जण त्या ठिकाणी आले.

CCTV | जुन्या भांडणातून तरुणावर गोळीबार, गोळी चुकवल्याने तरुण बचावला, पुण्यातील बिबवेवाडीत थरार
पुण्यात तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 11:01 AM

पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री टोळक्याने एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला. तरुणाच्या दिशेने गोळीबार (Firing) करत टोळक्याने दहशत निर्माण केली. यावेळी गोळी चुकवून तरुण घटनास्थळाहून पळाल्यामुळे थोडक्यात बचावला. त्यानंतर टोळक्याने परिसरात आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. या प्रकरणी बिबवेवाडी (Bibwewadi) पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार झालेला तरुण अमित कैलास थोपटे याचे दत्तवाडी परिसरात सलूनचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपींसोबत झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचा आरोप आहे. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

याबाबत अमित कैलास थोपटे (वय 32 वर्ष, रा. शिवशंकर सोसायटी, बिबवेवाडी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार सौरभ सरवदे, रुपेश सोनवणे उर्फ डिजे, निलेश सोनवणे, गणेश जगदाळे, बाबा बडबडे, अनिल कांबळे आणि इतर पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोपटे याचे दत्तवाडी परिसरात सलूनचे दुकान आहे. तो बिबवेवाडीत राहतो. चार फेब्रुवारी रोजी त्याचा आरोपींसोबत वाद झाला होता.

दोन दिवसांपूर्वीच्या भांडणाचा राग

बिबवेवाडीतील शिवशंकर सोसायटी समोर तक्रारदार, त्याचा भाऊ आणि इतर मित्र हे रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गप्पा मारत उभे होते. त्यावेळी चार फेब्रुवारीला झालेल्या भांडणावरुन आरोपी आणि इतर आठ ते दहा जण त्या ठिकाणी आले. त्यांच्या हातात काठ्या, कोयते होते.

गोळी चुकवून तरुण पसार

परिसरात येतानाच ते आरडाओरडा करत येत होते. सौरभ सरवदे याने त्याच्याकडील पिस्तूल काढले. हा सर्व प्रकार पाहून अमित थोपटे, त्याचा भाऊ आणि इतर सर्वजण पळाले. त्यावेळी आरोपीने थोपटे याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. पण, थोपटे याने गोळी चुकवल्यामुळे तो जखमी झाला नाही. त्यानंतर टोळक्याने परिसरात आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. गोळीबार झाल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर टोळके पसार झाले

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

सिगारेट उधार न दिल्याचा राग, दारुच्या नशेत दुकानदाराचा खून, रात्रीच्या अंधारात भयंकर कृत्य

धक्कादायक ! पुण्यातन गुंडांच्या टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर गोळीबार

झोमॅटो डिलिव्हरी बॉयची भररस्त्यात हत्या, फूड पार्सल पोहोचवायला जाताना खून

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.