रस्त्यात मोबाईलवर बोलताना सावध रहा! पुण्यात महिलांचे फोन चोरणाऱ्या चौघांच्या टोळीचा पर्दाफाश

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकातील पोलिसांनी सापळा रचून दोन नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींवरुन आलेल्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 मोबाईल जप्त केले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी कर्नाटकातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.

रस्त्यात मोबाईलवर बोलताना सावध रहा! पुण्यात महिलांचे फोन चोरणाऱ्या चौघांच्या टोळीचा पर्दाफाश
पुण्यात मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 12:50 PM

पुणे : महिलांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसाकावून नेण्याच्या घटना पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथक आणि सर्व्हेलन्स पथकाकडून पेट्रोलिंग करण्यात येत आहे. पेट्रोलिंग दरम्यान पथकाने महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या चार जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे.

2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. मनोज काशिनाथ कासले (वय-20 वर्ष), शिलारसाहेब मोहम्मद ईस्माईल सौदागर (वय-20 वर्ष), बालाजी धनराज कासले (वय-22 वर्ष), शेरली चांदसाहेब शेख (वय-22 वर्ष, सर्व रा. भालकी राज्य कर्नाटक सध्या रा. कस्तुरबा वसाहत औंध, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

आरोपींना विमानतळ पोलिसांनी विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात केली. विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांना विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात चार जण दुचाकीवरून मोबाईल स्नॅचिंग करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

चोरीच्या बाईक, 14 मोबाईल जप्त

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकातील पोलिसांनी सापळा रचून दोन नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींवरुन आलेल्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 मोबाईल जप्त केले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी कर्नाटकातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.

रस्त्याने एकट्याने फोनवर बोलत जात असाल, तर खबरदारी बाळगण्याचं आवाहन पुणेकरांना केलं जात आहे. निर्मनुष्य रस्ता असो, किंवा वर्दळीचे ठिकाण, लुटीची घटना टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.

पुण्यात मोबाईल चोरांचा महिलेकडून पाठलाग

पादचारी महिलेचा मोबाईल आणि पर्स लुटून चोरांनी पळ काढल्याचा प्रकार गेल्याच महिन्यात पुण्यात उघडकीस आला होता. हडपसर भागात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. महिलेने एक किलोमीटरपर्यंत चोरांचा पाठलागही केला, मात्र ते हाती लागले नव्हते.

काय घडलं होतं?

रस्त्यावर गाडीची वाट पाहत असलेल्या महिलेला दोघांनी लुटल्याची घटना पुण्यातील हडपसर भागातील यश रवी पार्क सोसायटीच्या समोर घडली होती. दिवसाढवळ्या महिलेच्या हातातील मोबाईलसह पर्सची चोरी करण्यात आली. दोघा चोरट्यांनी पर्स आणि मोबाईल हिसकावल्यानंतर महिलेने जवळपास 1 किलोमीटरपर्यंत चोरांचा पाठलागही केला, मात्र त्यांना पकडता आलं नाही. मात्र भामटे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | पन्नाशीची पुणेकर महिला, चोऱ्यांसाठी मुंबईत, पोलिसांच्या जाळ्यात कशी सापडली?

मूकबधिर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी, कल्याण पोलिसांकडून आरोपीला गुजरातमध्ये अटक

स्टेशनवर हिसका देऊन मोबाईल पळवला, पाठलाग करुन महिलेने चोरट्याला पकडलं

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.