पुण्यात दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, सात जणांचं फरार टोळकं अखेर जेरबंद

पुणे पोलिसांनी सात जणांच्या फरार टोळीला पेट्रोल पंपावरुन अटक केली. पूर्व वैमनस्यातून या आरोपींनी दोघा तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप झाला होता

पुण्यात दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, सात जणांचं फरार टोळकं अखेर जेरबंद
सात जणांच्या टोळक्याला अटक
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 11:17 AM

पुणे : पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात दोन तरुणांवर लोखंडी कोयत्याने वार करणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी पेट्रोल पंपावर या फरार टोळक्याला जेरबंद केलं. पूर्व वैमनस्यातून आरोपींनी दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.

टोळीकडील घातक शस्त्रही जप्त

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे आणि पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. तर या टोळीतील आणखी दोघांना नवीन कात्रज बोगद्याजवळून अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ यावेळी असलेली घातक शस्त्र पोलिसांनी जप्त केली.

कोणाकोणाला अटक

लकी अरुण गायकवाड (वय 19), तुषार प्रकाश डोबे (वय 21), तेजस तुकाराम येनपुरे (वय 19), आदित्य जगमोहन सिन्हा (वय 18), सार्थक संगीत मिसाळ (वय 19), शुभम रविंद्र हिरे (वय 21), तुकाराम रामचंद्र येनपुरे (वय 52, सर्व रा. दत्तनगर, जांभुळवाडी रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर यातील एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत त्याची येरवडा येथील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

पुण्यात बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार

दुसरीकडे, पुण्यातील गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये हॉटेल मालकावर कोयत्याने वार केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. दोघे जण बिर्याणी घेण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर मालकाची शाब्दिक आणि किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्या दोघांनी आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्यासारख्या धारदार हत्याराने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. तेव्हा हॉटेल मालकाच्या शेजारी उभा असलेल्या कामगार इसराफिल हा मध्ये आल्याने तो वार त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसून तो गंभीर जखमी झाला.

संबंधित बातम्या :

पुण्यात बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार, वादानंतर ग्राहकाचा मित्रांना बोलावून हल्ला

ग्राहकांसोबत क्षुल्लक वाद, 18 वर्षीय वेटरची गोळी झाडून हत्या

VIDEO | मुंबईत भाजी विक्रेत्याला मारहाण CCTV मध्ये कैद, तिघांना बेड्या

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.