पुण्यात दोघांचा एकाच झाडाला गळफास, तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर

शेताच्या बांधावरील झाडाच्या फांदीला दोघांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावला. आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडली आहे.

पुण्यात दोघांचा एकाच झाडाला गळफास, तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर
चाकण पोलीस स्टेशन
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 10:14 AM

पुणे : झाडाला एकत्र गळफास घेऊन तरुण-तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तरुणीने प्राण गमावले, तर तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातील शेल पिंपळगाव येथे हा प्रकार घडला.

काय आहे प्रकरण?

शेल पिंपळगाव गावात तरुण- तरुणीने एकत्र झाडाला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शेताच्या बांधावरील झाडाच्या फांदीला दोघांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावला. आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडली आहे.

तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर

या घटनेत तरुणीला गळफास बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरुण बेशुद्ध असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत, मात्र आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय त्यांनी का घेतला, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

जुन्नर तालुक्यातून हे दोघं नेमके कशासाठी आले होते, याचा चाकण पोलीस शोध घेत आहेत. मात्र प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरीत अकरावीतील विद्यार्थ्याची हत्या, बंद पडलेल्या कारखान्याजवळ मृतदेह आढळला

इगतपुरीतील लग्नातून नववधूचे सोन्याचे दागिने लंपास, मुंबईत तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहिता माहेरी, चारित्र्याच्या संशयातून पतीकडून हत्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.