पुण्यात 85 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या, मुलगा ताब्यात, जन्मदात्यांच्या खूनाची नववर्षातील तिसरी घटना

46 वर्षीय मुलाने आपल्या 85 वर्षीय पित्यावर आधी चाकूने हल्ला केला. त्यानंतर डोक्यात वरवंटा टाकून त्यांची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. राजगुरुनगरातील राहत्या घरातच गुरुवारी हा प्रकार घडला.

पुण्यात 85 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या, मुलगा ताब्यात, जन्मदात्यांच्या खूनाची नववर्षातील तिसरी घटना
पुण्यात मुलाकडून वडिलांची हत्या
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 7:46 AM

पुणे : पोटच्या मुलाने वृद्ध वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. 85 वर्षीय वडिलांवर चाकूने हल्ला केल्यानंतर डोक्यात वरवंटा घातल्याचा आरोप आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. नववर्षातील अवघ्या सहा दिवसात जन्मदात्यांची हत्या करण्याची ही तिसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

सख्ख्या मुलाने जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याच्या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. राजगुरुनगरातील राहत्या घरातच गुरुवारी हा प्रकार घडला. 46 वर्षीय मुलाने आपल्या 85 वर्षीय पित्यावर आधी चाकूने हल्ला केला. त्यानंतर डोक्यात वरवंटा टाकून त्यांची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे.

हत्येचं कारण अस्पष्ट

शंकर बोऱ्हाडे असं हत्या झालेल्या पित्याचं नाव आहे, तर मुलगा शेखर बोऱ्हाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र घरगुती वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

इंदापुरात आईची हत्या

धक्कादायक म्हणजे अवघ्या दोनच दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून करुन मुलाने वडिलांवरही जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील काझड येथे उघडकीस आला होता. आई-वडील मागितले तितके पैसे देत नाहीत, या कारणावरुन त्याने हा हल्ला केल्याचा आरोप झाला होता.

धनकवडीत आईचा जीव घेऊन मुलाची हत्या

पुण्यातील धनकवडी भागात 42 वर्षीय व्यक्तीने प्लास्टिकच्या पिशवीत डोकं घालून आईचा जीव घेतला. गुदमरल्यामुळे महिलेला प्राण गमवावे लागले होते. यानंतर त्यानेही आत्महत्या केली. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यात घडलेल्या या तीन घटनांमुळे खळबळ माजली आहे.

संबंधित बातम्या :

जन्मदात्या आईची हत्या, वडिलांवर कोयत्याने वार, जमिनीच्या वादातून इंदापुरात मुलाचा हल्ला

आधी आईला औषधाचा ओव्हरडोस दिला नंतर पॉलिथीनच्या पिशवीत तोंड बांधलं, पुढं जे घडलं त्यानं पुणे हादरलं

फळ विक्रेत्यांच्या भांडणात मध्यस्थी भोवली, नाशकात 31 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.