मुलीला अमेरिकेला सोडून परतलेल्या माऊलीची बॅग लंपास, ‘एअर फ्रान्स’च्या कर्मचाऱ्यावर पुण्यात गुन्हा
'एअर फ्रान्स' विमान कंपनीचे मुंबईचे तिकीट काढलेले होते. दरम्यान ही कनेक्टेड फ्लाइट असल्यामुळे पॅरिस येथे त्यांची फ्लाईट बदलण्यात आली. यावेळी सामान हलवताना या वस्तू गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पुणे : मुलीला शिक्षणासाठी अमेरिकेला सोडायला गेलेली महिला भारतामध्ये परत येत असताना तिच्या बॅगेतील सामान ‘एअर फ्रान्स’ कंपनीच्या कर्मचाऱ्याने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी ‘एअर फ्रान्स’ विमान कंपनीच्या अज्ञात कर्मचाऱ्यांविरुद्ध पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
हा प्रकार 16 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घडला. गौरी गिरीश शिंगोटे (वय 45, रा. त्रिदल नगर, येरवडा) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गौरी शिंगोटे या एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांच्या मुलीला अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. तिला शिक्षणासाठी अमेरिकेत सोडायला त्या सोबत गेल्या होत्या.
कनेक्टेड फ्लाईट बदलताना बॅगचोरी
मुलीची सर्व व्यवस्था करुन झाल्यानंतर त्या भारतामध्ये परत येत होत्या. त्यांनी ‘एअर फ्रान्स’ विमान कंपनीचे मुंबईचे तिकीट काढलेले होते. दरम्यान ही कनेक्टेड फ्लाइट असल्यामुळे पॅरिस येथे त्यांची फ्लाईट बदलण्यात आली. यावेळी सामान हलवताना या वस्तू गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यवतमाळमध्ये ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग चोरीला
याआधी, बस स्थानकावर विश्रांतीला थांबलेल्या ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग युनिफॉर्मसह चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. यवतमाळमध्ये घाटंजी बस स्थानकावर जुलै महिन्यात हा प्रकार घडला होता. चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्यामुळे पोलिसांनी केवळ एका तासात त्याला जेरबंद केलं होतं.
नेमकं काय घडलं होतं?
घाटंजी बस स्थानकावर यवतमाळ डेपोची बस क्रमांक MH07-9437 रात्री थांबली होती. हॉल्ट असल्यामुळे ड्रायव्हर-कंडक्टर कुमरे आणि सीडाम बस स्थानकाच्या रुममध्ये रात्री विश्रांती घेत थांबले होते. त्यावेळी रात्री जवळपास दीड वाजताच्या सुमारास एका चोरट्याने चक्क चालक-वाहकाती बॅग, खाकी वर्दी आणि तिकीट फाडण्याची मशिन चोरून नेली.
कपड्यातील पैशांचे पाकीट, त्यामध्ये असलेली महत्त्वाची कागदपत्रे पाकिटातून काढून फक्त 900 रुपये रोख रक्कम लंपास करुन बस स्थानकाच्या बाहेर मशीन आणि कपडे फेकून दिले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली.
सीसीटीव्ही फूटेजमुळे चोरटा जेरबंद
फुटेजमध्ये पाठमोरा दिसणारा चोरटा हा गजानन हिरालाल राठोड (रा. शिवपुरी तालुका कळम) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर घाटंजी पोलिसांनी त्याला केवळ एका तासात जेरबंद करुन गजाआड केले आहे.
संबंधित बातम्या :
बस स्थानकातून ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग युनिफॉर्मसह चोरीला, सीसीटीव्हीमुळे चोरटा जेरबंद
एटीएममधून हायटेक चोरी, सायबर गॅंगला नागपूर पोलिसांकडून जयपूरमध्ये अटक
म्होरक्या येरवडा तुरुंगात, टोळीच्या सदस्यांची मौजमजेसाठी चोरी, दोघे अटकेत