पिंपरीतील लॉजवर वेश्या व्यवसाय, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघींची देह व्यापाराच्या दलदलीतून सुटका

अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे येथील साई लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावला.

पिंपरीतील लॉजवर वेश्या व्यवसाय, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघींची देह व्यापाराच्या दलदलीतून सुटका
देह व्यापाराच्या रॅकेटमधून तिघींची सुटका
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 8:31 AM

पिंपरी चिंचवड : अभिनेत्रीकडून वेश्या व्यवसाय (Illegal Activity) करुन घेतला जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Crime) सामाजिक सुरक्षा विभागाने तिघी जणींची देह व्यापाराच्या रॅकेटमधून सुटका केली आहे. छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून (Chhattisgarh Actress) पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचा आरोप आहे. या अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची सुटका करण्यात आली. दोन दलालांना पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई ताथवडे येथील साई लॉजवर करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे येथील साई लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावला. त्यानंतर लॉजवर छापा मारुन कारवाई करण्यात आली.

अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची सुटका

आरोपी मोबाईलवरुन व्हॉट्सअॅप कॉल करुन वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवण्याचे काम करत होते. संबंधित मुली त्यांच्या नावावर हॉटेलमध्ये रूम बुक करत असत. या दलदलीतून छत्तीसगडच्या अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची सुटका करण्यात आली. दोन दलालांना पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

कोणाकोणाला अटक?

जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी, हेमंत प्रणाबंधू साहू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवला आणि महिला दलाल जाळ्यात अडकली, कल्याणमध्ये देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, महिला मालकासह दोघे अटकेत, चौघींची सुटका

75 बांग्लादेशी मुलींशी लग्न, दोनशे जणींना देह व्यापारात ढकललं, मुंबई-पुण्यासह देशभरात जाळं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.