डोंगरावर नेऊन दिराचा वहिनीवर बलात्कार, ओढणीने गळा दाबून हत्या, पुण्यात खळबळ

महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या चुलत दिराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपल्या मित्राच्या मदतीने आधी अत्याचार करुन मग वहिनीची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती आहे.

डोंगरावर नेऊन दिराचा वहिनीवर बलात्कार, ओढणीने गळा दाबून हत्या, पुण्यात खळबळ
पिंपरीत वहिनीवर बलात्कार करुन हत्या
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 1:54 PM

पिंपरी चिंचवड : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर विवाहिता मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या चुलत दिरालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मित्राच्या मदतीने वहिनीवर बलात्कार करुन दिराने ओढणीने गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी पहाटे हत्येचा प्रकार समोर आला.

काय आहे प्रकरण?

महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा चुलत दीर तुकाराम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपल्या मित्राच्या मदतीने आधी अत्याचार करुन मग वहिनीची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

आरोपी चुलत दीर तुकाराम याने वहिनीला देहू रोड जवळील घोरवडेश्वर येथील मंदिर पाहण्याच्या बहाण्याने डोंगरावर नेले. तुकारामने मित्र अक्षयला ‘आपण मज्जा करु’ असे सांगून बोलवून घेतले. त्यानंतर दीर तुकाराम आणि त्याचा मित्र अक्षय या दोघांनी घोरवडेश्वर येथील डोंगरावर घेऊन जाऊन वहिनीवर बलात्कार केला. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून, चेहऱ्यावर दगड टाकून तिची हत्या केली.

वाराणसीत डॉक्टर वहिनीची दीराकडून हत्या

दरम्यान, डॉक्टर वहिनीचे सततचे टोमणे ऐकून बेजार झालेल्या दीराने तिची हत्या केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. हातोडी आणि कात्रीने वार करत दीराने डॉक्टर विवाहितेला तिच्या क्लिनिकमध्ये जाऊनच संपवलं होतं. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. डॉ. सपना गुप्ता-दत्ता यांच्या हत्येनंतर आरोपी दीर अनिल दत्ताने पोलिसात आत्मसमर्पण केलं होतं.

नेमकं काय घडलं होतं?

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महमूरगंज भागात ही घटना घडली होती. रघुवर कॉलनीत असलेल्या डॉक्टर वहिनीच्या क्लिनिकमध्ये जाऊनच दीराने तिचा जीव घेतला होता. आपल्याला मूल होत नव्हतं, म्हणून डॉक्टर वहिनी सातत्याने टोमणे मारायची. चारचौघात त्यावरुन पाणउतारा करायची. त्यामुळे वहिनीविषयी मनात राग साठला होता, असा दावा आरोपीने केला होता.

हातोडी आणि कात्रीने डोक्यात वार

वहिनीचं क्लिनिक बंगल्याच्या तळ मजल्यावर होतं, तर आरोपीचे आई-वडील तिथेच वरच्या मजल्यावर राहतात. त्यांना भेटण्याच्या निमित्ताने आल्यावर वहिनी टोमणे मारायची. बुधवारीही तिने आपल्यासोबत आपल्या भावाविषयी आक्षेपार्ह उद्गार काढले. त्यामुळे हातोडी आणि कात्रीने डोक्यात वार करुन आपण तिची हत्या केली, अशी कबुली आरोपीने दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात नेले होते, परंतु डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज पाहून तपासाला सुरुवात केली होती. हत्येसाठी वापरलेला हातोडा आणि कात्रीही पोलिसांनी जप्त केले होते.

वहिनी-दीरामध्ये कौटुंबिक वाद

डॉ. सपना गुप्ता-दत्ता ही वाराणसीत दत्ता डायग्नॉस्टिक सेंटर चालवत होती. तिचे पतीही डॉक्टर असून त्यांना दोन मुली आहेत. सासरेही डॉक्टर असून त्यांच्या नावे बँकेत मोठी रक्कम जमा असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुनच वहिनी-दीरामध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु असल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या :

वहिनीची चाकूने भोसकून हत्या, दीराला अटक

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.