पिंपरीत मद्यपी तरुणाची गळा चिरुन हत्या, राहत्या घरी मृतदेह आढळला

मित्राने वीरेंद्र यांच्या घरी येऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळून आला. वीरेंद्र यांची दारुच्या नशेत हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही थरारक घटना घडली

पिंपरीत मद्यपी तरुणाची गळा चिरुन हत्या, राहत्या घरी मृतदेह आढळला
कांदिवलीत तरुणाची निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 11:27 AM

पिंपरी चिंचवड : दारुच्या नशेत असलेल्या व्यक्तीची गळा चिरुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील नेवाळे वस्ती भागात ही घटना घडली. मात्र त्याची हत्या कोणी आणि का केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

वीरेंद्र वसंत उमरगी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वीरेंद्र उमरगी यांचे पत्नीशी भांडण झाले होते. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ते विभक्त राहत होते.

नेमकं काय घडलं?

वीरेंद्र यांना दारु पिण्याचे व्यसन होते. दारु पिणारे मित्र त्यांच्याकडे ये-जा करत असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. त्यांच्या एका मित्राने फोन केला पण वीरेंद्र यांनी उचलला नाही. त्यामुळे मित्राने वीरेंद्र यांच्या घरी येऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळून आला. वीरेंद्र यांची दारुच्या नशेत हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून आरोपी फरार झाले आहेत.

पुण्यात हिटर छातीला कवटाळून विवाहितेची आत्महत्या

दरम्यान, घरातील विद्युत हिटर आपल्या छातीस कवटाळून विवाहितेने आत्महत्या केली. हिटरचा शॉक लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. धनश्री अजित करडे असे दौंड तालुक्यातील यवतमधील मयत महिलेचे नाव आहे.

सासरी जाच झाल्याचा आरोप

चारचाकी गाडी घेण्यासाठी महिलेला सासरी त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. हुंड्याची मागणी करुन तिला शिवीगाळ, दमदाटी करुन मानसिक आणि शारीरिक छळ देत होते. सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी यवत पोलीसांनी मयत विवाहित महिलेची सासू, नवरा, दीर आणि नणंद अशा चौघा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीतही महिलेचा राहत्या घरी गळफास

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड मधील सांगवी भागात महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्याच ठिकाणी रक्ताने माखलेली एक डायरीही आढळली होती.

ओढणीने गळफास घेत महिलेची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील सांगवी या भागात एका महिले स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी महिलेने तिच्याच ओढणीचा उपयोग केला. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड या भागात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे महिलेने आत्महत्या नेमकी का केली, हे समजू शकलेले नाही.

संबंधित बातम्या :

सोन्याच्या दागिन्यांचा हव्यास, चुलत सासूची हत्या करुन सुनेने दागिने ओरबाडले, कानाचेही लचके

ओढणीने गळफास लावून आत्महत्या, महिलेच्या मृतदेहाजवळ आढळली रक्ताने माखलेली डायरी, गूढ वाढलं

कोरोनाने पतीचा मृत्यू, विरहातून पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसह आत्महत्या, पुण्याच्या शिक्षक दाम्पत्याचा करुण अंत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.