VIDEO | भर चौकात गोळीबार, पुण्यात तरुणाची हत्या, जुन्या वादातून काटा काढला?

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण पोलीस ठाणे हद्दीतील शेलपिंपळगाव येथे एका तरुणाची हत्या करण्यात आली. भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे

VIDEO | भर चौकात गोळीबार, पुण्यात तरुणाची हत्या, जुन्या वादातून काटा काढला?
पुण्यात तरुणाची गोळी झाडून हत्या
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 9:04 AM

पिंपरी चिंचवड : चुलत भावाने अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुणे आणखी एका हत्येने हादरले आहे. एका तरुणाची भर चौकात गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा खून झाल्याची माहिती आहे. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. नागेश सुभाष कराळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण पोलीस ठाणे हद्दीतील शेलपिंपळगाव येथे एका तरुणाची हत्या करण्यात आली. भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारचाकी वाहनांमधून आलेल्या तीन आरोपींनी नागेश कराळे यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला आहे. नागेश कराळे हे आपल्या वाहनात बसत असताना हे मारेकरी एका चारचाकी वाहनातून आले आणि त्यांनी नागेश कराळे यांच्यावर पिस्तूलमधून एकापाठोपाठ चार ते पाच राऊंड फायर केले. गोळीबारात कराळेंचा जागीच मृत्यू झाला.

जुन्या वादातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी लावला आहे. मात्र ही हत्या कोणी केली, आणि त्यामागील कारण काय, हे अद्याप अस्पष्टच आहे.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिस्तूलमधून गोळ्या झाडून हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे थेट आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या :

अकरावीतील विद्यार्थ्याच्या हत्येचं गूढ उकललं,  स्टेटसमधून खुन्नस दिल्याने चुलतभावाकडून खून

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.