आजीचा उपचारादरम्यान मृत्यू, दारु पिऊन नातवाचा पुण्यातील रुग्णालयात राडा, डॉक्टरांना मारहाण

ही घटना पुणे जिल्ह्यातील देहू रोड मधील युनिकेअर हॉस्पिटल येथे घडली होती. आरोपी नातू तुषार सुरेश चव्हाण याच्या विरोधात देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजीचा उपचारादरम्यान मृत्यू, दारु पिऊन नातवाचा पुण्यातील रुग्णालयात राडा, डॉक्टरांना मारहाण
पुण्यात आजीच्या मृत्यूनंतर नातवाचा रुग्णालयात राडा
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 11:57 AM

पिंपरी चिंचवड : उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकाने हॉस्पिटलमध्ये राडा घातल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. आजीच्या मृत्यूनंतर नातवाने दारुच्या नशेत गोंधळ घातल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना शिवीगाळ करत तरुणाने कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हॉस्पिटलमध्ये राडा घालणाऱ्या नातवाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकाने हॉस्पिटलमधील डॉक्टरांना शिवीगाळ केली, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करत हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना पुणे जिल्ह्यातील देहू रोड मधील युनिकेअर हॉस्पिटल येथे घडली होती. आरोपी नातू तुषार सुरेश चव्हाण याच्या विरोधात देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

आरोपी तुषार चव्हाण याची आजी बेशुद्ध पडल्याने तिला बेशुद्ध अवस्थेत युनिकेअर हॉस्पिटलमध्ये आणले होते. उपचार सुरु असताना तुषारच्या आजीचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर तुषार याने दारुच्या नशेत हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. मोठमोठ्याने आरडाओरडा करून हॉस्पिटलमध्ये उपस्थित डॉक्टर आणि स्टाफ यांना मारहाण केली. या मारहाणीची घटना रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मुंबईत गर्भवतीचा मृत्यू

दुसरीकडे, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू झाल्याची वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर बीएमसीतर्फे या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे मृत्यूनंतर शवविच्छेदन करुन पोलीस प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी लाच मगितल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी तात्काळ आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरु केले. मात्र रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही, असा दावा पालिकेतर्फे करण्यात आला आहे. निशा कसबे असे मुलुंड भागातील गर्भवती महिलेचे नाव आहे. लाच प्रकरणी पोलिसांवर आणि गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पालिकेच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. गर्भवतीसह तिच्या बाळाचाही मृत्यू झाला.

रुग्णालयाचं स्पष्टीकरण काय

स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेची परिस्थिती बघून तिला नायर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी देखील नातेवाईक उपस्थित नव्हते. या अनुषंगाने नातेवाईकांशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संबंधित नातेवाईक येईस्तोवर रुग्णाची तब्येत आणखी खालावली, असं महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

मध्यरात्री महिलेचा मृत्यू

यानंतर संबंधित रुग्ण महिलेला स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात तात्काळ हलवण्यात आले. यानंतर कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी तात्काळ आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरु केले. मात्र, रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. ज्यानंतर मध्यरात्री 3.22 वाजता महिलेला मृत घोषित करण्यात आले. वैद्यकीय उपचार क्रमानुसार रुग्ण महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे गर्भवती महिला पत्रकाराचा मृत्यू, धक्क्याने वडीलही कोमात, बॉलिवूडकरांनी दिला मदतीचा हात!

गर्भवती महिलेला दाखल करुन घेण्यास 3 रुग्णालयांचा नकार, उपचारविना रिक्षातच मृत्यू

साताऱ्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे साडेआठ महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू?

दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.