AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीच्या प्रियकराची हत्या, मृतदेह हातभट्टीत जाळून राख शेळीसोबत पुरली, पिंपरीत ‘दृश्यम’ स्टाईल खून

पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मृतदेह दारुच्या हातभट्टीमध्ये जाळून टाकला. मृतदेह संपूर्णपणे जळाल्यानंतर त्या मृतदेहाची हाडे आणि त्यासोबत एक शेळी मारुन तिचा मृतदेह पोत्यात भरला आणि जवळ असलेल्या नाल्यात टाकला.

पत्नीच्या प्रियकराची हत्या, मृतदेह हातभट्टीत जाळून राख शेळीसोबत पुरली, पिंपरीत 'दृश्यम' स्टाईल खून
पुण्यात पत्नीच्या प्रियकराची हत्या
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 8:21 AM
Share

पिंपरी चिंचवड : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पतीने विवाहितेच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर मृतदेह हातभट्टीमध्ये टाकून जाळण्यात आला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम’ चित्रपटाशी साधर्म्य असलेली परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील बावधन येथे हा प्रकार घडला.

काय आहे प्रकरण?

पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मृतदेह दारुच्या हातभट्टीमध्ये जाळून टाकला. मृतदेह संपूर्णपणे जळाल्यानंतर त्या मृतदेहाची हाडे आणि त्यासोबत एक शेळी मारुन तिचा मृतदेह पोत्यात भरला आणि जवळ असलेल्या नाल्यात टाकला. जेणेकरुन पोलिसांची दिशाभूल होईल. मात्र हिंजवडी पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत तिघा जणांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

पती लंकेश रजपुत उर्फ लंक्या, गोल्या ऊर्फ अरूण रजपुत, सचिन तानाजी रजपुत यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

बावधन येथील भूषण चोरगे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. 21 ऑक्टोबर रोजी भरत याने महिलेला तिच्या मोबाईलवर दोन मिस कॉल दिले. त्यावेळी जवळ असलेला पती चिडला आणि त्याने विचारणा करत त्या महिलेला मारहाण सुरु केली. ही मारहाण सुरू असताना त्या महिलेने घरामधून पळ काढला.

त्यावेळी महिलेशी संपर्क न झाल्याने तिचा प्रियकर असलेला भूषण चोरगे हा महिलेला भेटण्यासाठी घराजवळ आला. मात्र भरत चोरगे तिथे आल्याचं समजताच महिलेच्या पतीने आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून त्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.

भरतचा मृतदेह चारचाकी वाहनातून उरवडे गावामध्ये असलेल्या हातभट्टीमध्ये दोन दिवस जाळला. भरतचा मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख आणि इतर अवशेष हे घोटावडे परिसरातील नाला आणि नदीत टाकून पुरावा नष्ट केला. त्यानंतर मुख्य आरोपी हा मध्य प्रदेशमध्ये पळून गेला.

मृत तरुणाच्या आईला चप्पल दिसली

दरम्यान भूषण चोरगेच्या कुटुंबीयांनी हिंजवडी पोलिसांत तो मिसिंग असल्याची तक्रार दिली. त्याच दिवशी भरत चोरगे याच्या आईला त्याची चप्पल आरोपी लंकेश राजपूत याचा घराजवळ दिसली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तपासाची चक्रे ही लंकेश राजपूतकडे वळवली असता तपासात ही घटना समोर आली.

सर्व आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी हा घटनाक्रम सांगितला. त्यामध्ये ज्यावेळी मयत भूषण चोरगेला दारुच्या भट्टीमध्ये जाळलं, त्यावेळी त्याची हाडं आणि भूषण चोरगेच्या पायामध्ये काही वर्षांपूर्वी डॉक्टरांनी बसवलेला लोखंडी रॉड टाकून दिलेल्या ठिकाणावरुन आरोपीनी दिला. तो हस्तगत करत पोलिसांनी त्यानुसार अधिक तपास सुरु केला आहे

ज्याप्रमाणे दृश्यम चित्रपटात मृतदेह सापडत नाही, त्यामुळे पोलीस आरोपींना पकडू शकत नाहीत, त्याप्रमाणेच आपण पकडले जाणार नाही, असे समजून आरोपींनी सर्व कट रचत ही हत्या केली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

धक्कादायक! सहकाऱ्याने लग्न मोडलं, छळवणुकीला कंटाळून पुण्यात महिला पोलिसाची आत्महत्या

सीआयडी मालिका पाहून पुण्यात भलतंच कृत्य; अल्पवयीन मुलांकडून वृद्ध महिलेची हत्या

कळव्यात करवा चौथला दुसरी थेट घरी आली, नवऱ्यानं पहिलीला जीवंत जाळलं, गर्भवतीचं काय चुकलं?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.