नवरा दहा वर्ष घर सोडून पसार, घरी येऊन पत्नीची हत्या, पिंपरीत महिन्याभराने खुनाचं गूढ उलगडलं
दरम्यान, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. बलात्कार, सामूहिक बलात्कार, खून आणि गँगवॉरच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात सप्टेंबर महिन्यात दहा दिवसांच्या कालावधीतच हत्येच्या तब्बल आठ घटना समोर आल्या होत्या.
पिंपरी चिंचवड : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी हत्येचा उलगडा करण्यात यश मिळवलं आहे. थेरगावमध्ये 23 सप्टेंबरला बाळासाहेब जाधव याने पत्नी सुनीता जाधवची डोक्यात वार करुन हत्या केली होती
पोलिसांनी अखेर आरोपी बाळासाहेब जाधव याला जेरबंद करत बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी यापूर्वी दोन वेळा घर सोडून पळून गेला होता. त्यावेळी आधी सात वर्ष, तर दुसऱ्या वेळी तीन वर्ष त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. हत्येनंतर मात्र पोलिसांनी त्याला महिन्याभराच्या आत पकडण्यात यश मिळवलं आहे.
पिंपरीत महिलेची हत्या
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात धावडे वस्तीमध्ये राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. कलावती धोंडिबा सुरवार असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. रात्री अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात घुसून धारदार शास्त्राने वार करत तिची हत्या केल्याचा आरोप होता.
पिंपरीत हत्येच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. बलात्कार, सामूहिक बलात्कार, खून आणि गँगवॉरच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात सप्टेंबर महिन्यात दहा दिवसांच्या कालावधीतच हत्येच्या तब्बल आठ घटना समोर आल्या होत्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पण पोलिसांना या घटनांचं खरंच गांभीर्य आहे का? हा चिंतनाचा भाग आहे. कारण या घटनांवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अजब दावा केला होता.
जोपर्यंत भर चौकात खून होत नाहीत, तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, असा दावा त्यांनी गेल्या महिन्यात केला होता. कृष्ण प्रकाश यांची दबंग पोलीस अधिकारी म्हणून ख्याती आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संबंधित बातम्या :
पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसात आठ खून, 38 वर्षीय महिलेची घरात घुसून हत्या