Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरीतील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चौघींची सुटका, स्पा चालक अटकेत

वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींना आणि त्यांच्याकडून व्यवसाय करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत होता

पिंपरीतील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चौघींची सुटका, स्पा चालक अटकेत
पिंपरी चिंचवडमध्ये देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 9:13 AM

पिंपरी चिंचवड : पुण्यामध्ये वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून देह व्यापार करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये हा प्रकार घडला.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींना आणि त्यांच्याकडून व्यवसाय करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी चौघी तरुणींची सुटका केली. तर स्पा चालक दीपक साळुंखे आणि अमित काटे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पिंपरीतील बार आणि लॉजवर छापेमारी 

याआधी, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रात्री बार आणि लॉजवर छापेमारी केली होती. जगताप डेअरी परिसरातील अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांनी धाड टाकली होती. यावेळी 200 हून अधिक तरुण-तरुणींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं होतं.

लॉज-बारमध्ये काय सुरु होतं?

कोव्हिडसंबंधी नियमांचे उल्लंघन करुन अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि 18 डिग्री रुफ टॉप बार सुरु होते. दारु पिऊन आणि इतर मादक पदार्थांचं सेवन करुन तरुण-तरुणी वीकेण्ड पार्टी साजरी करत होते. अॅलो गॅस्ट्रो लॉजमधून 113, तर एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारमधून 105 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

नालासोपाऱ्यात चाळीत सेक्स रॅकेट

दुसरीकडे, नालासोपाऱ्यात चाळीतील खोलीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नुकतंच पोलिसांना यश आलं आहे. खोलीत तरुणींना डांबून ठेवून, त्यांना जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप आहे. नालासोपाऱ्यातील वालीव पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.

चार पीडित मुलींची सुटका

नालासोपारा पूर्व पेल्हार गावातील खान कम्पाउंडमध्ये संबंधित महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती भाभी नावाने परिचित होती. वालीव पोलिसांनी छापा मारुन या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यातील चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली, तर दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

दोन लाखांचे निरोध सापडले

अटकेतील आरोपींमध्ये एका तृतीयपंथीयाचा, तर एका महिलेचा समावेश आहे. वसुंधरा संजय तिवारी (वय 48) आणि अंजली राजकुमार यादव (वय 45) असे अटक आरोपींची नाव असून वसुंधरा तिवारी ही तृतीयपंथी आहे. या आरोपींकडून 2 लाख 53 हजार 440 रुपये किमतीचे निरोध (कंडोम्स) असलेले 22 मोठे बॉक्स, रोख रक्कम आणि मोबाईल ही जप्त केले आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्यात बनावट ग्राहक पाठवून लॉजवर छापा, देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघींची सुटका

अंधेरीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघींची सुटका, तिघांना अटक

नालासोपाऱ्यातील चाळीत वेश्या व्यवसाय, महिलेसह तृतीयपंथीयाला बेड्या, दोन लाखांचे कंडोम सापडले

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.