Pimpri Murder | पिंपरीत अकरावीतील विद्यार्थ्याची हत्या, बंद पडलेल्या कारखान्याजवळ मृतदेह आढळला

पिंपरी चिंचवड : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराबाहेर गेलेला अल्पवयीन तरुण रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. यावेळी एका बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात त्याचा मृतदेह सापडला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात ही हादरवणारी घटना घडली आहे. काय आहे प्रकरण? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगांव दाभाडे […]

Pimpri Murder | पिंपरीत अकरावीतील विद्यार्थ्याची हत्या, बंद पडलेल्या कारखान्याजवळ मृतदेह आढळला
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 8:51 AM

पिंपरी चिंचवड : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराबाहेर गेलेला अल्पवयीन तरुण रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. यावेळी एका बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात त्याचा मृतदेह सापडला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात ही हादरवणारी घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर गोळीबाराची घटना घडल्याची माहिती आहे. इयत्ता 11 वी मध्ये शिकणाऱ्या मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

विद्यार्थी घरी न आल्याने शोधाशोध

संबंधित विद्यार्थी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास आपल्या घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याची शोधाशोध केली, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात मृतदेह

विद्यार्थ्याचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह हा पोलीस ठाण्याजवळील एका बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात आढळला. त्याच्या डोक्यात गोळी लागलेली होती. विद्यार्थ्याचा कोणाशी कसलाही वाद नव्हता, अशी कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र ही हत्या का झाली आणि कोणी केली हा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. या प्रकरणी तळेगांव दाभाडे पोलीसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

इगतपुरीतील लग्नातून नववधूचे सोन्याचे दागिने लंपास, मुंबईत तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला म्हणत पतीने पत्नीला भोसकले; घटनेनंतर आरोपी फरार

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहिता माहेरी, चारित्र्याच्या संशयातून पतीकडून हत्या

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.