AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंद घरं हेरुन चोऱ्या, पिंपरीत दोघा सख्ख्या भावांना अटक, तब्बल 48 ठिकाणी घरफोड्या

साहील रमेश नानावत उर्फ अल्लु अर्जुन देवदास ऊर्फ दास रमेश नानावत आणि योगेश नुर सिंह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर आणखी चौघा जणांचा शोध पोलिस घेत आहेत. या टोळीने तब्बल 48 घरफोड्या केल्याचे समोर आले आहे.

बंद घरं हेरुन चोऱ्या, पिंपरीत दोघा सख्ख्या भावांना अटक, तब्बल 48 ठिकाणी घरफोड्या
पिंपरी चिंचवडमध्ये घरफोड्यांची टोळी जेरबंद
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 8:37 AM
Share

पिंपरी चिंचवड : दिवसा बंद असलेली घरे शोधून रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. घरफोडीतील दागिने घेणाऱ्या एका सोनाराला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

18 लाखांचा मुद्देमाल जप्त

या टोळीतील चार आरोपी फरार आहेत. आरोपींकडून 220 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकल, गॅस सिलेंडर, होम थिएटर, बॅटऱ्या, कुलर, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 18 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सख्ख्या भावांना अटक, चौघांचा शोध

साहील रमेश नानावत उर्फ अल्लु अर्जुन देवदास ऊर्फ दास रमेश नानावत आणि योगेश नुर सिंह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर आणखी चौघा जणांचा शोध पोलिस घेत आहेत. या टोळीने तब्बल 48 घरफोड्या केल्याचे समोर आले आहे.

पुण्यात चोरीच्या पैशातून सावकारी

दुसरीकडे, पुण्यात चोरीच्या पैशातून सावकारी करणाऱ्या अट्टल चोरट्याला चिंचवड पोलिसांनी गेल्याच महिन्यात बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याकडून 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. चोरटा जे घर बंद आहे, त्याची दिवसभर पाहणी करायचा. त्यानंतर रात्री घरफोडी करायचा. लखन अशोक जेटीथोर असे अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह रवी शिवाजी भोसले, सुरेश नारायण जाधव यांना देखील अटक करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

घरफोड्या करून त्याने लाखो रुपयांची माया जमवली होती. त्या चोरीच्या पैशांतून त्याने चक्क सावकारी व्यवसाय सुरू केला होता. या अट्टल चोरट्याचा माग काढून चिंचवड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चायनिजची गाडी चालवल्याचा बनाव

आरोपी लखन जेटीथोर हा चायनीजची गाडी लावून त्यावर आपली उपजीविका चालवत असल्याचे दाखवत होता. दिवसा बंद घरांची रेकी करून रात्रीच्या वेळी देखील ती घरे बंद असल्याची खात्री करत असे. त्यानंतर त्याच्या सोयीने घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे लखन आजूबाजूच्या परिसरात अडगळीच्या ठिकाणी टाकत असे. मध्यरात्री दोन वाजल्यानंतर येऊन तो रेकी केलेले घर फोडत असे.

या कारवाईमुळे चोरी केलेले 78 तोळे सोने, 10 टीव्ही, गुन्ह्यासाठी वापरलेली फॉर्च्युनर असा एकूण 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागपुरात चोरट्याची अनोखी शक्कल

दुसरीकडे, नागपुरातही चोरीचा अनोखा फंडा समोर आला आहे. आरोपी पवन हा ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करायचा. ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू डिलिव्हरी बॉय परिसरात घेऊन आला की आरोपी त्याला 5 मिनिटं थांबवून आपल्या गाडीत बसून त्यातील सामान काढून घ्यायचा. त्यानंतर त्यात साबणासारख्या वस्तू भरायचा आणि पॅक करुन डिलिव्हरी बॉयला परत करायचा. आपल्याकडे सध्या पैसे नाहीत. त्यामुळे घेऊन जा, असं तो कारण द्यायचा. त्याने अनेक दिवस हे प्रकार केल्याचे तपासात समोर आले होते.

संबंधित बातम्या :

ठाण्यात आधी ज्वेलरीच्या दुकानात चोरी, आता हातपाय बांधून तोंडात रुमाल कोंबून हत्येचा कुटुंबाकडून आरोप

चोरट्याने तब्बल 20 तिजोऱ्या फोडल्या, इचलकरंजीत गोविंदराव कॉलेजमध्ये 4 लाखांची चोरी, सीसीटीव्हीत चोर कैद

नागपुरातील तरुणाचा चोरीचा अनोखा फंडा, ऑनलाईन ऑर्डर, डिलिव्हरी बॉय आल्यावर पाच मिनिटात अफरातफर, नंतर वस्तू परत

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.