Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याचा भाव देणारी व्हेल माशाची उलटी, वन विभागाच्या चतुराईने पुण्याचे सहा जण ‘असे’ सापडले

देवमाशाची उलटी म्हणजेच अ‍ॅम्बरग्रिस हे हलक्या राखाडी किंवा काळ्या रंगाचे मेणासारखे असते. परफ्युम आणि अनेक औषधे तयार करण्यासाठी ते वापरले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ते सोन्यासारख्या महाग किंमतीने विकले जाते.

सोन्याचा भाव देणारी व्हेल माशाची उलटी, वन विभागाच्या चतुराईने पुण्याचे सहा जण 'असे' सापडले
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे अटकेत
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 3:00 PM

पुणे : व्हेल माशाच्या उलटीची (Whale Vomit)  म्हणजेच अ‍ॅम्बरग्रीसची (Ambergris) तस्करी झाल्याचं प्रकरण पुण्यात समोर आलं आहे. पुणे वन विभागाने मोठी कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. तीन किलो वजनाची अंदाजे पाच कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. पिंपरी चिंचवड मधील पूर्णानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या उलटीचा उपयोग अत्तर बनवण्यासाठी करण्यात येणार होता.

नेमकं काय घडलं?

पूर्णानगर भागात व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा आणि वन कर्मचारी यांनी बनावट ग्राहक पाठवला. त्यावेळी, आरोपी मुहमदनईन मुटमतीअली चौधरी, योगेश्वर साखरे, अनिल कामठे, कृष्णात खोत, ज्योतिबा जाधव, सुजाता जाधव या आरोपींना व्हेल माशाच्या उलटीची विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले.

आरोपी रंगेहाथ सापडले

पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, मयूर बोठे, प्रदीप संकपाळ, महेश मेरगेवाड, विजय शिंदे, सुरेश बर्ले, रामेश्वर तेलंग्रे, महादेव चव्हाण, गणेश पाटील यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. यावेळी तीन किलो वजनाची अंदाजे पाच कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली.

देवमाशाची उलटी इतकी का महाग?

देवमाशाची उलटी म्हणजेच अ‍ॅम्बरग्रिस हे हलक्या राखाडी किंवा काळ्या रंगाचे मेणासारखे असते. परफ्युम आणि अनेक औषधे तयार करण्यासाठी ते वापरले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ते सोन्यासारख्या महाग किंमतीने विकले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याची तस्करी करुन छुप्या पद्धतीने खरेदी-विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस येतात. अ‍ॅम्बरग्रीस हे व्हेल माशाच्या शरीरात तयार होत असून देवमाशाने तोंडावाटे ही उलटी बाहेर फेकल्यानंतर बहुतांश वेळा ते समुद्र किनारी सापडते.

देवगडचा प्रामाणिक मच्छिमार

दुसरीकडे, व्हेल माशाच्या उलटीची म्हणजेच तस्करी करणारे रॅकेट नुकतेच ठाण्यात पकडले होते, त्याचवेळी सिंधुदुर्गातील देवगडमध्येही एका मच्छिमाराला किनाऱ्यावर व्हेल माशाची उलटी सापडली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उलटीला सोन्याचा भाव आहे, मात्र मच्छिमाराने प्रामाणिकपणा दाखवत ही उलटी वन विभागाच्या ताब्यात दिली होती.

संबंधित बातम्या

मुंबईत हायप्रोफाईल वस्तीत Ambergris ची खरेदी-विक्री, पोलिसांकडून सापळा रचत टोळीचा पर्दाफाश

एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.