दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरणं अंगलट, पोलीस निरीक्षकाबाबत ‘हे’ आदेश

गेल्या आठवड्यात पुण्यातील समर्थ वाहतूक पोलिस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला त्याच्या दुचाकीसह टोईंग व्हॅनमध्ये उचलून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता

दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरणं अंगलट, पोलीस निरीक्षकाबाबत 'हे' आदेश
बाईकसकट उचलून दुचाकीस्वाराला टोईंग व्हॅनमध्ये भरणाऱ्या पोलिसाची बदली
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 11:56 AM

पुणे : दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरणं पोलीस निरीक्षकाला भोवल्याचं दिसत आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून बदली करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या आठवड्यात पुण्यातील समर्थ वाहतूक पोलिस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला त्याच्या दुचाकीसह टोईंग व्हॅनमध्ये उचलून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. सोशल मीडियावर याचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर जोरदार टीका झाली होती.

राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून थेट विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. प्रशासन विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी यासंबंधी आदेश दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

नो पार्किंगमध्ये बाईक उभी केल्याची तक्रार वाहतूक पोलिसांकडे आली होती. त्यानंतर वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी तिथे दाखल झाले. यावेळी बाईकस्वार आपल्या बाईकवर बसून राहिला. मात्र पोलिसांनी उद्दामपणा करत त्याला बाईकसह उचलून टोईंग व्हॅनमध्ये ठेवल्याचं समोर आलं होतं. गुरुवार 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.

पुणेकरांचा संताप

ज्या पद्धतीने पोलिसांनी ही कारवाई केली आहे, त्याबद्दल पुणेकरांकडून संताप व्यक्त केला गेला.  वाहनचालक जरी चुकत असेल, तरी अशा पद्धतीने वाहतूक पोलिसाने कारवाई करणं, कितपत योग्य आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. वाहन उचलणं ठीक, पण वाहनासह चालकालाही उचललं जाण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं मत पुणेकरांनी व्यक्त केलं होतं.

दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि त्याला मार लागला असता, तर याला कोण जबाबदार राहिलं असतं? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित झाला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे काय कारवाई करणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यानंतर आठवड्याभरातच त्यांची बदली केल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात वाहतूक पोलिसांचा उद्दामपणा, दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टेम्पोत भरलं

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.