Pimpri crime| कानशिलात लागवल्याच्या रागातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलांनी तरुणासोबत केलं असं काही की….; CCTV ने उलगडला घटनाक्रम

सुनील सगर यांना दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे सगर चिडले व त्यांनी दुचाकीवरील एका अल्पवयीन मुलांच्या कानशिलात लगावली. मात्र कानशिलात लावल्याचा राग आल्याने अल्पवयीन मुलांनी सुनील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

Pimpri crime|  कानशिलात लागवल्याच्या रागातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलांनी तरुणासोबत केलं असं काही की....; CCTV ने उलगडला घटनाक्रम
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 12:34 PM

पिंपरी- शहरातील चिखली परिसरात 17 अल्पवयीन मुलांनी डोक्यात दगड घालत तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुले चालवत असलेल्या दुचाकींचा संबधित तरुणाला धक्का लागला. धक्का लागल्याच्या रागातून मृत तरुणाने अल्पवयीन दुचाकी स्वाराला कानशिलात लगावली. तरुणाने कानशिलात लागवल्याचा राग मनात धरून त्याने तरुणाला दगड मारलं यात तरुण जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मृताच्या पत्नीने तक्रार दिली आहे.

तर झालं असं की… या घटनेत सुनील शिवाजी सगर (वय 35 , रा. जाधववाडी, चिखली), असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे, घटनेच्या दिवशी दोन्ही अल्पवयीन मुले दुचाकी घेऊन मित्राकडे जात होती. त्यावेळी जाधववाडी, चिखली येथे सुनील सगर यांना दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे सगर चिडले व त्यांनी दुचाकीवरील एका अल्पवयीन मुलांच्या कानशिलात लगावली. मात्र कानशिलात लावल्याचा राग आल्याने अल्पवयीन मुलांनी सुनील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीपासून स्वतः:चा बचाव करण्यासाठी ते पळत-पळत एका किराणा दुकानात घुसले. परंतु अल्पवयीन मुलांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर 17  वर्षीय व 14 वर्षीय  अल्पवयीन मुलाने सुनील यांना दुकानाबाहेर ओढून काढत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. इथेच असलेला सिमेंटचा ब्लॉक उचलत सुनील यांच्या तीनवेळा डोक्यात घातला यात ते गंभीर जखमी झाले. या गोंधळात नागरिक जमा होताच मुलांनी इथून पळ काढला. जखमी सुनीक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

CCtv मुळे खुनाचा झाला उलगडा

अज्ञात मुलांनी मारहाण केल्यामुळे आरोपींचा शोध घेणं पोलीस अवघड झाले होते. मात्र या सर्व घटने दरम्यान आरोपींनी वापरलेली दुचाकी पोलिसांच्या नजरेस पडली. त्या दुचाकीच्या आधारे दुचाकी मालकापर्यंत पोलीस पोहचले. घटनेच्या दिवशी दुचाकी कुणाकडे होती अशी चौकशी केली असता, संबंधित दुचाकी मालकाच्या मुलाच्या मित्रांनी दुचाकी नेल्याचे समोर आले. यातून खुनाच्या घटनेचा या उलगडा झाला व खऱ्या अल्पवयीन आरोपींपर्यत पोहचणे पोलिसांना शक्य झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा सुगीचे दिवस, IPO मधून होऊ शकते कमाई! येत्या तीन महिन्यात गुंतवणुकीच्या नव्या संधी 

Weather Update | कडाक्याच्या थंडीत ढगाळ वातावरण, राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Car Accident| टायर फुटून कार टँकरवर आदळली; दीड वर्षाच्या नातीसह आजीने सोडले प्राण

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.