पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एनआयएचे महासंचालक शहरात, पोलीस आयुक्तांशी गुफ्तगू

Pune Crime News : पुणे शहरातील दोन दहशतवादी पकडले गेले होते. त्या दहशतवाद्यांचा मुंबई, पुणे शहरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होतो. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक झाली आहे. याविषयासंदर्भात एनआयएचे संचालक पुणे शहरात आहे.

पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एनआयएचे महासंचालक शहरात, पोलीस आयुक्तांशी गुफ्तगू
Dinker Gupta and Ritesh Kumar
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 4:14 PM

पुणे | 5 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात दोन दशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. एका मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात पकडण्यात आले ते दोन आरोपी होते. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. मग पुणे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर एनआयएच्या यादीत मोस्ट वॉटेंड असणारे इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी असल्याचे समोर आले. यानंतर या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक झाली. त्यानंतर इसिस प्रेमी डॉक्टर डॉ.अदनान अली सरकार याला एनआयएने अटक केली. या प्रकारानंतर एनआयएचे महासंचालक पुणे शहरात आले.

एनआयए महासंचालक भेटले आयुक्तांना

पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एनआयएचे महासंचालक पुण्यात आले. एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची भेट घेतली. गुप्ता यांनी आयुक्त रितेशकुमार यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच ते दोघे दहशवादी पुणे आणि मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासातून पुढे आली. यामुळे एनआयएसह देशातील सर्व तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. गुप्ता यांनी यावेळी पुणे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. या भेटी दरम्यान राज्यातील एनआयएचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

पुणे दहशतवादी चौघांना कोठडी

इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि या दहशतवाद्यांना मदत करणारे इतर दोघे अशा चारही जणांना पुणे जिल्हा न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे. या चारही आरोपीकडून अनेक संशयास्पद वस्तू मिळून आल्या असल्याचा ATS कडून न्यायालयात सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा

तसेच हे सगळे ISIS ची संबधित असल्याचे तपासात उघड झाले आहे. या सर्वांना एक दहशवादी संपर्क करत होतो, त्याचा शोध घ्यायचा असल्याचे एटीएसने सांगितले. मेल आणि फोनद्वारे तो व्यक्ती या दहशतवाद्यांना सूचना देत होता. या सगळ्यांनी एकत्र येत त्यांच्या घरी अनेक टेस्टिंग देखील केल्या होत्या. या आरोपींचे शिक्षण कमी आहे, परंतु तांत्रिक ज्ञान चांगले होते, त्यांचा अजून तपास घ्यायचा असल्याचे एटीएसने सांगितले. एटीएसचा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने त्यांना ११ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.