Pimpari Chinchwad : घरात घुसून 6 लाखांचा मुद्देमाल चोरणारी अखेर गजाआड! वाकड पोलिसांकडून महिलेला अटक
Pimpari Chinchwad Crime : घर बंद असताना झालेल्या चोरीच्या घटनेनं आजूबाजूच्या घरांमध्येही भीती पसरली होती.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिसांनी (Wakad Police in Pimpari Chinchwad) एका चोरट्या महिलेला अटक (lady theft arrested) केली आहे. या महिलेनं घरात घुसून 6 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला हो. बंद घरात घुसून चोरी करणाऱ्या या महिलेनं अशा अनेक चोऱ्या केल्या असण्याचीही शंका घेतली जाते आहे. बंद घरात घुसून या चोरट्या महिलेनं तब्बल 6 लाख रुपयांचा मुद्देमालावर हात साफ केला होता. याप्रकरणी वाकड पोलीस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत या चोरीप्रकरणी तपास करत महिलेला बेड्या (Pimpari Chinchwad Crime) ठोकल्या आहेत. या महिलेकडून चोरी केलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. सध्या या महिलेची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे. वाकड पोलिसांनी मारुंजीमधून या महिलेला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
कुणाची तक्रार कुणाला अटक?
वाकड पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणारे ताजुद्दीन तांबोळी यांच्या घरात चोरी झाली होती. घर बंद असताना झालेल्या चोरीच्या घटनेनं आजूबाजूच्या घरांमध्येही भीती पसरली होती. यानंतर ताजुद्दीन तांबोळी यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत वाकड पोलीस स्थानक गाठत चोरीची तक्रार दिली.
वाकड पोलिसांनी ताजुद्दीन तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवून घेत तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला. सीसीटीव्हीमध्ये एका दुचाकीच्या मदतीनं ही चोरी करण्यात आली असल्याचं समोर आलं. त्या आधारं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अखेर मारुंजीमधूल चोरी कऱणाऱ्या महिलेला बेड्या ठोकल्यात.
चोरीचा मुद्देमालही हस्तगत
चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव मीरा साठे असं आहे. मीरा साठे या महिलेकडून 120 ग्रॅम दागिन्यांसह सहा लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आता या महिलेनं अशाप्रकारे अनेक चोऱ्या केल्या आहेत का? या संशयाखाली अधिक तपास केला जातो आहे. त्याअनुशंगानं चोऱ्या करणाऱ्या या महिलेची कसून चौकशी केली जाते आहे. वाकड पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या या चौकशीन काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय.