Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpari Chinchwad Suicide: महिलेसमोर नाक घासायला लावल्याने तरुणाची आत्महत्या! अपमान सहन न झाल्यानं जीव दिला

Pimppari Chinchwad crime: अपमान सहन न झाल्याने या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना डुडुळगाव इथं घडली आहे.

Pimpari Chinchwad Suicide: महिलेसमोर नाक घासायला लावल्याने तरुणाची आत्महत्या! अपमान सहन न झाल्यानं जीव दिला
आत्महत्येच्या घटनेनं खळबळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 11:47 AM

पिंपरी : अपमान झाला म्हणून तरुणानं जीव दिल्याची (Young boy suicide) धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. 29 वर्षीय तरुणानं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचं समोर आलंय. गळफास घेऊन तरुणानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. महिलेबाबत चुकीचं वक्तव्य केलं असं समजून (Mis-understanding) या तरुणाला चौघांनी मारहाण केली होती. इतकंच काय, यानंतर या तरुणाला महिलेसमोर नाकही घासायला लावलं होतं. गैरसमजुतीतून हा सगळा प्रकार घडला असल्याचाही संशय व्यक्त केला जातो आहे. या घटनेनंतर झालेला अपमान तरुणाला सहन झाल्यानं त्यानं आयुष्य संपवलंय. या तरुणानं आत्महत्या केल्याचं कारण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव सचिन तळेकर असं आहे. सचिन 29 वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येनंतर आता पोलिसात तक्रारही (Dighi Police Station) दाखल करण्यात आली आहे.

…म्हणून जीव दिला!

पिंपरी चिंचवडमध्ये काही तरुणांनी सचिन तळेकर याला मारहाण केली होती. महिलेबाबात चुकीचं वक्तव्य केल्याच्या गैरसमजातून सचिनला मारहाण करण्यात आली. फक्त मारहाणच नाही, तर यानंतर सचिनला महिलेसमोर नाकही घासायला लावण्यात आलं होतं.

दरम्यान, झालेला अपमान सहन न झाल्यामुले सचिन सोपान तळेकर या तरुणानं टोकाचं पाऊल उचललंय. ही धक्कादायक घटना डुडुळगाव इथं घडली.दरम्यान, आत्महत्येच्या घटनेनंतर आता पोलिस याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरुणाला मारहाण केलेल्या चार जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

कुणी नाक घासायला लावलं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाला मारहाण करणाऱ्या तरुणांची नावंही समोर आली आहे. किरण रामदास कान्हुरकर, विजय दत्तात्रय तापकीर, अमोर बाळासाहेब तापकीर आणि अभिनव अर्जुन गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. या संपूर्ण तक्रारीनंतर आता यांच्यावर कारवाई काय होते, हे पाहणं महत्त्वाचंय. तर दुसरीकडे तळेकर कुटुंबीयांना सचिनच्या आत्महत्येनं मोठा धक्का बसलाय.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.