Pimpri Chinchwad : अगं आई गंsss! आईच्या डोळ्यांदेखतच 6 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

Pimpri Chinchwad CCTV Video : लोखंडी मशिन अंगावर पडल्यानं या सहा वर्षांच्या चिमुरड्याला इतका जबर मार बसतो, की त्यातच त्याचा मृत्यू होतो.

Pimpri Chinchwad : अगं आई गंsss! आईच्या डोळ्यांदेखतच 6 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद
धक्कादायक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 11:08 AM

पिंपरी चिंचवड : एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad News) एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे खेळता खेळता या चिमुरड्यानं आपल्या आईच्या डोळ्यांदेखत प्राण (Son died in front of his Mother) सोडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Video) कैद झाली. एका फॅब्रिकेशन शॉपमध्ये ही भयंकर घटना घडली. मंगळवारी (5 जून) रोजी संध्याकाळी चार-साडे चार वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. आईसोबत हा चिमुकला वॉशिंग सेंटरमध्ये आलेला होता. गाडी धुण्यासाठी आलेले आई आणि मुलगा शेजारीच असलेल्या फॅब्रिकेशनच्या दुकानात थांबलेले होते. तिथे बसून ते गप्पा मारत होते. आई मुलाचा एकमेकांशी संवाद सुरु होता. त्याच वेळी मुलगा खेळण्याच्या इराद्याने शेजारी असलेल्या लोखंडी मशिनजवळ गेला. या मशिनशी खेळण्याचा प्रयत्न करत असतेवेळी दुर्दैवी घटना घडली.

नेमकं काय झालं?

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एकूण चार लोक दिसून आलेत. दोघे जण फॅब्रिकेशनचं काम करताना दिसत आहेत. तर आई एका बाकावर बसली आहे. तर मुलगाही तिच्यासोबत आहे. मुलगा खाली बाकड्याशेजारी उभा आहे. आई आणि मुलगा यांचा एकमेकांशी संवाद सुरु आहेत. यात एका क्षणी मुलगी शेजारी असलेल्या एका मशिनसोबत खेळायला जातो. ही मशिन जड असल्याचं भासल्यानंतर तो त्यावर आपलं वजन टाकतो. पण इतक्यात होत्याचं नव्हतं होतं.

मशिन सोबत खेळण्याच्या प्रयत्नात असतानाच ही वजनदार लोखंडी मशिन या मुलाच्या थेट डोक्यावरच उलटते. त्यात या मुलाच्या डोक्याला गंभीर इजा होते. लोखंडी मशिन अंगावर पडल्यानं या सहा वर्षांच्या चिमुरड्याला इतका जबर मार बसतो, की त्यातच त्याचा मृत्यू होतो. अवघ्या काही क्षणांत मुलाच्या जाण्याने या मुलाच्या आईलाही जबर धक्का बसलाय.

हे सुद्धा वाचा

कुठे घडली घटना?

पिपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरामध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पिंपळे गुरव परिसरातील साठ फुटी रोडवरील एका फेब्रिकेशन शॉप या भीषण घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. या घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.