Pimpri Chinchwad Crime : वेश्या व्यवसाय करणाऱ्यांपासून तिघींची सुटका! वाकडमधल्या हॉटेलात पोलिसांची धाड, दोघींवर गुन्हा

Pimpri chinchwad crime news : हा वेश्या व्यवसहा तिघे जण मिळून चालवत होता. ऑनलाईन चॅटिंग सोशल ऍप असलेल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क करुन त्यांना हॉटेलात बोलावलं जात होतं.

Pimpri Chinchwad Crime : वेश्या व्यवसाय करणाऱ्यांपासून तिघींची सुटका! वाकडमधल्या हॉटेलात पोलिसांची धाड, दोघींवर गुन्हा
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 10:55 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Crime) पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या वाकडमध्ये (Wakad Police) पोलिसांनी धाड टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा पर्दाफाश केलाय. एका हॉटेलात पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर तिघा महिलांची सुटका करत दोघा महिलांवर गुन्हादेखील नोंदवून घेतला आहे. व्हॉट्सअपवरुन वेश्या व्यवसायाचं रॅकेट (Human Trafficking) चालवलं जात होतं. या टोळीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने दणका दिलाय. पीडित तरुणींवर बळजबरी करत त्यांच्याकडून जबरदस्ती वेश्याव्यवसाय केला जात होता. ग्राहकांशी व्हॉट्सअपवरच संपर्क करुन त्यांना हॉटेलात बोलावलं जात होता. दरम्यान, यावेळी पोलिसांनी सापळा रचून वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना रंगेहाथ पकडलंय. सध्या दोघी जणींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर आणखी एकाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय.

चौकशी सुरु

सध्या ताब्यात घेतलेल्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाते आहे. ही टोळी आणखी मोठी असण्याचीही शंका व्यक्त केली जातेय. वाकड इथल्या रांजना लॉजवर पोलिसांनी सामाजिक सुरक्षा पथकासह धाड टाकली. यावेळी ती पश्चिम बंगालमधील तिघा मुलींच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचं निदर्शनास आलं. या मुली सिलिगुडीतील राहणाऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

हा वेश्या व्यवसहा तिघे जण मिळून चालवत होता. ऑनलाईन चॅटिंग सोशल ऍप असलेल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क करुन त्यांना हॉटेलात बोलावलं जात होतं. रॉनी बच्चालाल भारती, अमित उर्फ प्रवीण बळीराम आसटकर आणि वैष्णवी उर्फ रोहिणी भोसले या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्यांच्याविरोधात 370, 3, 34 यासोबत अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956चं कलम 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तिघा आरोपींपैकी वैष्णवी आणि रॉनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर अमितचा शोध सुरु आहे. सध्या पोलिस वैष्णवी आणि रॉनीची कसून चौकशी करत असून त्यांच्या या रॅकेटची मोट्स ऑपरेंडी काय होती, याचाही आता लवकरच खुलासा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे या टोळीशी संबंधित इतरही काही लोकं असतील, तर त्यांनाही अटक करण्यात जाईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.