प्रेमभंग, सासरी होणाऱ्या त्रासामुळे 5 महिन्यांत 26 आत्महत्या, पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय काय ?

पिंपरी चिंचवडमध्ये मागील पाच महिन्यांत तब्बल 26 जणांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

प्रेमभंग, सासरी होणाऱ्या त्रासामुळे 5 महिन्यांत 26 आत्महत्या, पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय काय ?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 7:24 PM

पुणे : सिने क्षेत्रातील नावाजले गेलेले कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांनी पिंपरी चिंचवडच्या वाकड येथे आत्महत्या करत स्वत:ला संपवलं. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये मागील पाच महिन्यांत तब्बल 26 जणांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यात प्रेमभंग, सासरी होणारा त्रास ही प्रमुख कारणे आहेत. (Pimpri Chinchwad total 26 people committed suicide over 5 months)

5 महिन्यांत 26 जणांच्या आत्महत्या

प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. पिंपरी चिंचवड येथील वाकडमध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या या आत्महत्येनंतर आता याच भागातील मागील पाच महिन्यांतील आत्महत्येची आकडेवारी समोर आली आहेत. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी आत्महत्या केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील पाच महिन्यात पिंपरी चिंचवड भागात तब्बल 26 जणांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये प्रेमभंग, सासरी होणारा त्रास ही प्रमुख कारणे आहेत.

आव्हान, अपयश स्वीकारण्याची मानसिकता, सहनशीलता कमी

विशेष म्हणजे सध्याची कोरोना परिस्थिती आणि कोरोनामुळे मंदावलेले उद्योगधंदे या कारणामुळेसुद्धा अनेकांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये अनेक उच्च शिक्षितांनीही आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालंय. औद्योगीकरणामुळे नागरिकांची जीवनशैली बदलत आहे. तसेच वाढत्या धावपळीमुळे आव्हान, अपयश स्वीकारण्याची मानसिकता आणि सहनशीलता मात्र कमी होत आहे. याच कारणामुळे गळफास घेणे, नदीत उडी मारणे, जाळून घेणे असे आत्महत्येचे अनेक पर्याय निवडले जात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

पालघरमध्ये हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

मालकाने भाड्यासाठी वारंवार तगादा लावल्यामुळे एका हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 15 जुलै रोजी विरारमध्ये घडली. आत्महत्या करण्याचे कारण हे भाड्यासाठी तगादा लावणे हेच असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. करुणाकरण पुत्रण(Karunakaran Putraan, वय 48) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकांचे नाव असून, पुत्रण यांना दोन लहान मुलं आहेत. या घटनेमुळे विरार परिसरात खळबळ उडाली आहे. गळफास घेत पुत्रण यांनी स्वत:ला संपवलं आहे.

पुत्रण यांना हॉटेल व्यवसायात म्हणावा तेवढा फायदा झाला नाही

मिळालेल्या माहितीनुसार विरार पश्चिमेकडील वायके नगर परिसरात स्टार प्लॅनेट नावाचे एक हॉटेल आहे. हे हॉटेल करुणाकरण पुत्रण मागील काही दिवसांपासून चालवत होते. मात्र, यापूर्वी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणि सध्याचे निर्बंध यामुळे पुत्रण यांना हॉटेल व्यवसायात म्हणावा तेवढा फायदा झाला नाही. ग्राहकच नसल्यामुळे पैसे मिळाले नाहीत. परिणामी हॉटेलचे भाडे थकले.

इतर बातम्या :

गळ्यातील दीड तोळ्याच्या सोन्याच्या चैनीवर मित्रांचा डोळा, संधी मिळताच हत्या, चैन घेऊन लंपास

रिक्षा भाड्याच्या वादातून प्रवाशांकडून आधी शाब्दिक चकमक, नंतर थेट मारहाण, रिक्षाचालक महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु

काळ्या पिशवीत कोहळा, त्यावर टाचणी टोचून मुलीचा फोटो, शिरुरच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार, गावात खळबळ

(Pimpri Chinchwad total 26 people committed suicide over 5 months)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.