Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा खेडकर लेडी नटवरलाल, कोर्टात अशी केली फसवणूक…विजय कुंभार यांचा दावा

पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकर हिच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याच्या तयारीत आहे. शिवाय बदनामी केल्याप्रकरणी पूजा खेडकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकर लेडी नटवरलाल, कोर्टात अशी केली फसवणूक...विजय कुंभार यांचा दावा
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 3:49 PM

आयपीएसची उमेदवारी रद्द झालेली पूजा खेडकर हिची एक, एक प्रकरणेसमोर येत आहेत. पूजा खेडकर हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केली होती. तीन वेगवेगळे नावे वापरुन यूपीएससीची परीक्षा 12 वेळा दिली होती. यूपीएससी परीक्षा देण्याची संधी केवळ नऊ वेळा असते. त्यामुळे 9 वेळा पूजा दिलीपराव खेळकर तर तीन वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव वापरत तीन यूपीएसची फसवणूक केली होती. तसेच पूजा खेडकर हिच्या अपंग प्रमाणपत्र आणि क्रिमिलेअर प्रमाणपत्रावरसुद्धा संशय निर्माण झाला आहे. यामुळे या प्रकरणी दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पूजा खेडकर हिने वेगवेगळी नाव देऊन कोर्टात याचिका दाखल केल्याचा दावा केला आहे.

विजय कुंभार यांनी काय काय म्हटले?

विजय कुंभार यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, लेडी नटवरलाल पूजा खेडकर विविध नावे वापरण्यासाठी प्रसिद्ध आहे. डॉ. खेडकर पूजा दिलीपराव, सौ. पूजा दिलीपराव खेडकर, डॉ. कु. पूजा मनोरमा दिलीप खेडेकर अशी तीन नावे तिने पुन्हा वापरली आहे. कोर्टातील याचिकेत तीन नावे तिने वापरली आहे. कायदेशीर प्रक्रियेचा हा दुरुपयोग आहे. ती फरार आहे. तिच्या या चालींमागे कोण आहे? असा प्रश्न विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे जिल्हाधिकारी गुन्हा नोंदवणार?

पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकर हिच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याच्या तयारीत आहे. शिवाय बदनामी केल्याप्रकरणी पूजा खेडकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. कायदेशीर सल्ला घेऊन पुणे जिल्हाधिकारी पुढील कारवाई करणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात पूजा खेडकर हिने छळवणुकीचा आरोप केला होता. दरम्यान पुणे पोलिसांनी आतापर्यंत तीन समन्स बजावूनही पूजा खेडकर हजर झाल्या नाहीत.

देशात इतर अधिकारी- विजय कुंभार

फक्त पूजा खेडकर नाही तर असे अनेक अधिकारी बनावट प्रमाणद्वारे झाल्याची शक्यता विजय कुंभार यांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी अमोल आवटे यांच्याही आता नाव घेतले आहे. गुजरात केडरचे अधिकारी अमोल आवटे यांनी ही खोटी माहिती दिल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. 2022 पूर्वी कसलीही दुखापत नसल्याची माहिती अमोल आवटे यांनी दिली होती. वास्तविक त्यांना दुखापत असल्याने UPSC कडून परीक्षा देण्यासाठी पाच वर्षाची सवलत मिळाली आहे. तरी ही ते माहिती खोटी देत असल्याचे कुंभार यांनी म्हटले. पूजा खेडकर प्रकरणात खेडकर हिच्यावर कारवाई झाली असली तरी UPSC चे अधिकारी ही त्यात सहभागी असू शकतात असा आरोप त्यांनी केला आहे.

हे ही वाचा

एक होती IAS पूजा खेडकर! अधिकारी बनवण्याचा रुबाब, कॅबिन अन् अंबर दिव्याची घाई, आता सर्वच गमावून बसली

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.