lalit patil drug case | ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, तपास अधिकारी…

lalit patil drug case | पुणे येथील ससून रुग्णालयातून कैदी ललित पाटील फरार झाला. या प्रकरणात आता सर्वच जण खळबळून जागे झाले आहेत. पुणे पोलिसांनी या प्रकरणात मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे...

lalit patil drug case | ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, तपास अधिकारी...
Lalit PatilImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 11:41 AM

पुणे | 16 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयात सुरु असलेले ड्रग्स तस्करी प्रकरण नुकतेच उघड झाले होते. या प्रकरणातील आरोपी ललित पाटील फरार झाल्यानंतर ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. त्यानंतर राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली. समितीने या प्रकरणीची चौकशी सुरु केली असताना पुणे पोलिसांनी मोठा बदल केला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. तसेच तपास अधिकारी बदलला आहे. यामुळे एकाच वेळी सर्वच पातळीवर कारवाई सुरु झाली आहे.

तपास अधिकारी बदलला, आता तपास गुन्हे शाखेकडे

ललित पाटील प्रकरणात राज्य शासन, ससून प्रशासनाकडून पावले उचलली गेल्यानंतर आता पोलिसांनीही मोठा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे तपास करणार आहेत. यापूर्वी हा तपास गुन्हे शाखेचे सुनील थोपटे यांच्याकडे होता. परंतु सुनील तांबे यांचा गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हे प्रकरण देण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आहे.

भूषण पाटील यांचे दोन सहकारी अटकेत

नाशिकमध्ये ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील यांच्याशी संबंधित लोकांवर कारवाई केली जात आहे. नाशिकमध्ये भूषण पाटील याचे सहकारी असलेले शिवाजी शिंदे आणि रोहितकुमार चौधरी या दोघांना अटक केली आहे. भूषण पाटील याचे मित्र आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. पुणे पोलिसांचे एक पथक सध्या नाशिकमध्ये कायमस्वरूपी तळ ठोकून आहे.

हे सुद्धा वाचा

ललित पाटील याचा शोध, पथके रवाना

पुणे पोलिसांकडून ललित पाटील याचा शोध सुरु आहे. ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील पुणे पोलिसांना मिळाला आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे. ललित पाटील याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....