Pune Crime News : पुण्याचा बिहार व्हायला सुरुवात, पुण्यात गुंडाचा हैदोस, दहशत पसरवण्यासाठी व्हिडीओचा वापर

पुणे शहरात (Pune City) गुंडांनी हैदोस घातला आहे. पुण्याचा बिहार व्हायला सुरुवात झाली. हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण केली जात आहे. हा धक्कादायक प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. बालाजी नगर (Balaji Nagar) येथील रजनी कॉनर परिसरात धारदार हत्यार हातात घेऊन दहशत पसरावली जात आहे.

Pune Crime News : पुण्याचा बिहार व्हायला सुरुवात, पुण्यात गुंडाचा हैदोस, दहशत पसरवण्यासाठी व्हिडीओचा वापर
pune cctvImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 1:42 PM

पुणे – पुणे शहरात (Pune City) गुंडांनी हैदोस घातला आहे. पुण्याचा बिहार व्हायला सुरुवात झाली. हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण केली जात आहे. हा धक्कादायक प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. बालाजी नगर (Balaji Nagar) येथील रजनी कॉनर परिसरात धारदार हत्यार हातात घेऊन दहशत पसरावली जात आहे. हातात कोयते घेऊन नागरिकांना रस्त्यात मारलं जात आहे. फुकट भाजी दिली नाही म्हणून मारहाण केली जात आहे. पाया पडायला लावलं जात आणि तो व्हिडीओ काढून दहशत पसरली जात आहे. तर दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाला पाया पडायला लावणे अशा अनेक प्रकरणाचे व्हिडीओ पुण्यात पाहायला मिळत आहे. याबाबत नागिरकांनी आत्तापर्यंत अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु पुणे पोलिस (Pune Police) त्याबाबत कडक कारवाई करीत नसल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे दहशत पसरतवत असलेले गुंड नेमके कुणाचे आहेत असा प्रश्न पुण्यातील सामान्य नागरिकांना पडला आहे.

गुंडांना नेमकं कोण पाठीशी घालतंय

बालाजीनगर मधले अट्टल चोर, दहशत करणे, धारदार हत्यार बनवने, लोकांना व लहान मुलांना त्रास देण्याचं काम करीत आहे. रस्त्यावर लेडीज चालल्या की छेडछाड करणे, छेडछाड करीत असताना व्हिडीओ काढणे अशा पद्धतीची दहशत करीत आहेत. परिसरातील नागरिकांनी सहकारनगर पोलिस स्टेशनकडे वेळोवेळी तक्रारी केलेली आहे. तक्रारी करूनही मुलांना भीती उरली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना छेडणे, हत्यार दाखवणे धमकी देणे हे राजरोस सुरू आहे. पोलीस आयुक्त त्याचबरोबर सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलीस चौकीत वेळोवेळी नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र कुठलाच प्रतिसाद तक्रारदारांना मिळत नाही. यामुळे गुंडांना नेमकं कोण पाठीशी घालत आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

नेमकं व्हिडीओत काय आहे

पुण्यातील एका चौकात रात्रीच्या वेळेत काही मुलं हातात हॉकी स्टीक घेऊन फिरत असल्याचे दिसत आहे. ते कोणालातरी शोधत आहेत, किंवा कोणाला तरी मारायला निघाले असावेत असं व्हिडीओ पाहिल्यावर वाटतंय. दुसऱ्या व्हिडीओत एका मुलाला अंधारात बेदम मारहाण करीत आहेत.

Imran Khan No-Trust Vote: संसद बरखास्त करा, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस; अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर मोठा निर्णय

Raj Thackeray वर बोलू नका असदुद्दीन ओवेसीचा फतवा, एमआयएम कार्यकर्त्यांना फर्मान; इम्तियाज जलील यांची माहिती

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू, घाटकोपरपासून सुरूवात; मुंबईचं राजकीय वातावरण तापणार?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.