Pune Crime | 4700 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार आरोपीस सात वर्षानंतर अटक

Pune Crime News Samriddhi Jeevan Foods Scam | भारतातील सुमारे 64 लाख लहान गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एका मुख्य आरोपीस पकडण्यास पुणे सीआयडीला यश आले आहे. तब्बल सात वर्षानंतर आरोपीच्या मुसक्या बांधण्यात आल्या आहेत.

Pune Crime | 4700 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार आरोपीस सात वर्षानंतर अटक
Pune Police
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 10:05 AM

अभिजित पोते, पुणे | 8 डिसेंबर 2023 : पुणे जिल्हांसह इतर जिल्ह्यांमध्ये केलेल्या चीट फंड घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपीला पुणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली आहे. भारतातील सुमारे 64 लाख लहान गुंतवणूकदारांची फसवणूक करुन आरोपी फरार झाला होता. समृद्ध जीवन ग्रुप नावाने कंपनीकडून, खोटी आश्वासने देऊन लाखो लोकांना गुंतवणूक करण्यास लावली होती. 4700 कोटी रुपयांचा हा घोटाळा होता. पुण्यासह राज्यातील उस्मानाबाद, जळगाव या जिल्ह्यांमध्ये आरोपी विरोधात गुन्हे दाखल आहे. 2015 आणि 2016 मध्ये पैशांची अफरातफर आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी समृद्ध जीवन या कंपनीच्या संचालकांवर करण्यात गुन्हे दाखल आले होते. रामलिंग हिंगे (वय ५६, रा. गोकुळनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महेश मोतेवार व रामलिंग हिंगे यांनी ही फसवणूक केली होती. या दोघे मुख्य आरोपी आहे. महेश मोतेवार अजूनही फरार आहे.

26 गुन्हे दाखल

समृद्धी जीवन ग्रुप कंपनीविरोधात 2015 आणि 2016 पुण्यासह राज्यातील उस्मानाबाद ,जळगाव या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात ग्रुपचे चेअमरन महेश मोतेवर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य आहेत. सर्वांविरोधात एकूण 26 गुन्हे दाखल होते. सीबीआय, ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, झारखंड आणि आंध्र प्रदेशातील पोलिसांना हे आरोपी हवे होते. देशातील 64 लाख गुंतवणूकदारांची त्यांनी फसवणूक केली होती. त्यात महाराष्ट्रातील १८ लाख गुंतवणूक आहेत. या प्रकरणात 25 आरोपी आहे. त्यातील 16 जणांच आतापर्यंत अटक झाली आहे.

सात वर्षांपासून आरोपी फरार

कंपनीचे चेअरमन महेश मोतेवार आणि संचालक रामलिंग हिंगे गेल्या सात वर्षांपासून फरार आहेत. त्यातील रामलिंग हिंगे याला आता अटक झाली आहे. हिंगे सातारा रोडवरील सिटी प्राईडजवळ येणार असल्याची माहिती सीआयडीला मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. महेश मोतेवार याने समृद्धी जीवन फुड्स इंडिया लिमिटेड आणि समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज को. ऑप सोसायटी स्थापन केली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.