Pune News : पुणे शहरात भरदिवसा १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा थरार, पोलिसांनी काही तासांत…
Pune Crime News : पुणे शहरात अपहराणाचा थरार मंगळवारी सकाळी घडला. १४ वर्षीय मुलीचे घरासमोरुन अपहरण झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सापळा रचला आणि काही तासांत मुलीची सुटका झाली अन् आरोपींनी...
प्रदीप कापसे, पुणे | 12 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारीवर सर्वत्र चर्चा सुरु आहे. शहरात पोलिसांकडून उपाययोजन करुन गुन्हेगारी कमी होत नाही. मंगळवारी एका १४ वर्षीय मुलाचे अपहरण झाले. त्या मुलाच्या घरासमोरुनच भरदिवसा अपहरण करण्यात आले.अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांकडे तब्बल 30 लाखांची खंडणी मागितली. हे प्रकरण सासवड पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी तत्पर कारवाई सुरु केली. आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला.
पोलिसांनी आरोपींना केली अटक
पुणे शहरातील पिंपरी चिंचवड भागातून १४ वर्षीय मुलाचे अपहरण मंगळवारी सकाळी तिच्या घरासमोरुनच झाले. मंगळवारी सकाळी आरोपींनी काळया रंगाच्या झेन कारमधून हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मुलाचे अपहरण केले. त्यानंतर मुलाच्या वडिलांकडे ३० लाखांची खंडणी मागितली. दरोडा विरोधी पथक आणि सासवड पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी सापळा रचला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी कुठे गेले ते तपासले. त्यानंतर काही तासांत आरोपींना पकडत मुलाची सुटका केली.
का केले होते अपहरण
पोलिसांनी तीन आरोपींना सासवड येथून ताब्यात घेतले. या आरोपींकडून पिस्तूल, कोयता, सतुर, कटवणी, लोखंडी, हातोडी अशी हत्यारे जप्त केली गेली. तेजस लोखंडे, अर्जुन राठोड, विलास म्हस्के या आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यावेळी मुलीचे अपहरण कशासाठी केले होते, हे त्यांनी सांगितले. आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे आपण हे अपहरण केल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का? याचा शोध पोलीस घेणार आहे. परंतु भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे खळवळ उडाली आहे.