पुणे शहरात अटक केलेल्या ‘त्या’ दहशतवाद्यांची पार्श्‍वभूमी माहिती असताना घर दिले, एटीएसने केली अटक

Pune Crime News : पुणे शहरात दीड वर्षांपासून दहशतवादी राहत होते. यापैकी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांची एटीएसकडून चौकशी सुरु आहे. त्यात धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पुणे शहरात अटक केलेल्या 'त्या' दहशतवाद्यांची पार्श्‍वभूमी माहिती असताना घर दिले, एटीएसने केली अटक
अज्ञात कारणातून शिक्षकावर हल्ला
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 11:03 AM

योगेश बोरसे, पुणे | 28 जुलै 2023 : पुणे शहरात राहणाऱ्या दोन दहशतवाद्यांना १८ जुलै रोजी अटक करण्यात आली. दीड वर्षापासून शहरात राहणाऱ्या या दोघांना एका गाडी चोरीच्या गुन्हा प्रकरणात पकडले होते. यावेळी त्यांची चौकशी करताना ते घाबरले. त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. त्यांची नावे त्यांनी खोटी सांगितली. ट्रू कॉलरमध्ये त्यांची खरी नावे समजली. त्यानंतर ते जयपुरातील सीरियल ब्लास्ट प्रकरणाशी संबंधित आरोपी असल्याचे कळून आले. या दोघांना कोंढवा परिसरात घर देणाऱ्या व्यक्तीला विशेष तपास पथकाने अटक केली आहे.

का केली अटक

पुणे पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोघांना अटक केली होती. या दोघांना कोंढवा येथे घर देणारा अब्दुल पठाण याला अटक केली आहे. त्याला या दोघांची पार्श्‍वभूमी माहिती असतानाही त्यांना घर भाड्याने दिले. तसेच त्यांना ग्राफिक डिझाईनचे काम दिले. त्यासाठी त्या दोन्ही दहशतवाद्यांना आठ हजार रुपये मासिक पगार अब्दुल पठाण देत होता, असा खुलासा एटीएसने न्यायालयात केला आहे.

न्यायालयाने दिली पोलीस कोठडी

अब्दुल पठाण याला अटक केल्यानंतर एटीएसने त्याला न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयात त्याची पोलीस कोठडीची मागणी गेली. न्यायालयाने एटीएसची ही मागणी मान्य करत पाच ऑगस्टपर्यंत त्याला कोठडी दिली.

हे सुद्धा वाचा

तिसऱ्या आरोपीचा फोटो जारी

पुणे पोलिसांनी अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोघांना अटक केली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला तिसरा आरोपी शहानवाज आलम फरार झाला. ATS कडून त्याचा फोटो जारी करण्यात आला आहे. त्याने या दोघांना लॉजिस्टिक मदत केली होती.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.