बायको बाहेरगावी गेली होती, आधी पोटाच्या मुलीला संपवले, त्यानंतर…पुण्यात काय घडले

Pune Murder and Suicide case: पिंपरी चिंचवडमधील थेरगाव येथे भाऊसाहेब बेदरे (वय ४३) त्यांची पत्नी राजश्री राहतात. त्यांना आठ वर्षांची नंदिनी आणि पंधरा वर्षांचा आशीष हा मुलगा आहे. या चौकणी कुटुंबात काय घडले? त्यामुळे दोन जणांचा जीव गेला, हा प्रश्न आहे.

बायको बाहेरगावी गेली होती, आधी पोटाच्या मुलीला संपवले, त्यानंतर...पुण्यात काय घडले
भाऊसाहेब बेदरे आणि नंदिनी
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 9:02 AM

पुणे | 20 मार्च 2024 : पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी चिंचवडमधील थेरगाव भागात राहणाऱ्या भाऊसाहेब बेदरे यांची पत्नी माहेरी गेली होती. त्यानंतर मंगळवारी नैराश्यातून भयानक पाऊल उचलले. त्यांनी पोटच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत जीवन संपवले. हा प्रकार का घडला? याचा खुलासा तपासातून होणार आहे. परंतु घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात या प्रकाराचे प्राथमिक कारण समोर आले आहे.

पिंपरी चिंचवडमधील थेरगाव येथे भाऊसाहेब बेदरे (वय ४३) त्यांची पत्नी राजश्री राहतात. त्यांना आठ वर्षांची नंदिनी आणि पंधरा वर्षांचा आशीष हा मुलगा आहे. या चौकणी कुटुंबात काय घडले? त्यामुळे दोन जणांचा जीव गेला, हा प्रश्न आहे. भाऊसाहेब बेदरे यांची पत्नी राजश्री माहेरी गेली होती, त्याचवेळी हा प्रकार घडला.

काय घडले

भाऊसाहेब यांच्या पत्नी राजश्री कामानिमित्त गावी गेल्या होत्या. त्यानंतर पहाटे त्या घरी परतल्या. त्यावेळी घरी नेण्यासाठी त्यांनी भाऊसाहेब यांना फोन केला. परंतु भाऊसाहेब यांना फोन उचलला नाही. त्यामुळे त्या स्वत: घरी पोहोचल्या. घरी आल्यावर आशिषने दरवाजा उघडला. त्यांनी बाबा कुठे आहेत? अशी विचारणा आशिषकडे केली. त्यानंतर बेडरुममध्ये गेल्यावर मुलगी झोपलेली दिसली. ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्यांना हादरा बसला. त्यानंतर किचनमध्ये आल्यावर भाऊसाहेब बेदरे यांनी गळफास घेतलेले दिसले. दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना मिळाली सुसाईड नोट

पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईट नोट मिळाली. त्यामध्ये कारण दिले आहे. आर्थिक विवंचनेतून जीवन संपवत असल्याचे भाऊसाहेब यांनी त्या नोटमध्ये म्हटले आहे. भाऊसाहेब बेदरे हे बांधकाम व्यवसायात आहेत. ते ठेके घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.