छगन भुजबळ धमकी प्रकरणास वेगळेच वळण, आरोपीला पुणे कोर्टाने सोडले कारण…

Pune Crime News : पुणे पोलिसांनी छगन भुजबळ धमकी प्रकरणात प्रशांत पाटील या आरोपीला अटक केली. त्या आरोपीने फक्त छगन भुजबळ यांनाच धमकी दिली नाही तर इतर नेत्यांनाही धमकीचे फोन केले होते. परंतु आता पुणे कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.

छगन भुजबळ धमकी प्रकरणास वेगळेच वळण, आरोपीला पुणे कोर्टाने सोडले कारण...
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 10:49 AM

पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ११ जून रोजी फोनवरुन जीवे मारण्याची धमकी आली होती. छगन भुजबळ मंत्री झाल्यानंतर त्यांना ही धमकी आली होती. त्यांच्या कार्यालयात फोन करुन प्रशांत पाटील या व्यक्तीने त्यांना धमकी दिली होती. मला भुजबळ यांना मारण्यासाठी सुपारी मिळाली आहे, असे त्याने सांगितले होते. या फोननंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. त्यांनी आरोपीचा शोध सुरु केला. त्यानंतर प्रशांत पाटील याला अटक केली.

आता न्यायालयाने दिला जामीन

पुणे न्यायालयात प्रशांत पाटील याच्या जमिनावर सुनावणी झाली. त्यावेळी त्याला वकील मिळाला नाही. त्यामुळे विधी सेवा प्राधिकरणाकडून ॲड. सचिन साळुंके यांनी त्याचे कामकाज पाहिले. न्यायालयात पोलिसांच्या वकिलांनी प्रशांत पाटील याला जामीन देण्यास विरोध केला. यावेळी ॲड. सचिन साळुंके यांनी पोलिसांनी नियमांचे पालन केले नाही, असा युक्तीवाद केला. त्यासाठी त्यांनी अर्नेशकुमार विरुद्ध बिहार या खटल्याचे उदाहरण दिले.

या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते की, सात वर्षांच्या आतील शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यापूर्वी नोटीस पाठवणे गरजेचे आहे. परंतु या ठिकाणी प्रशांत पाटील याला नोटीस पाठवली नाही. तसेच गुन्हा अदखलपात्र असल्यास त्याची चौकशी किंवा आरोपीला अटक करण्यापूर्वी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाची परवानगी हवी असते. ही परवानगीसुद्धा पोलिसांनी घेतली नाही. न्यायालयाने ॲड. सचिन साळुंके यांच्या युक्तीवाद मान्य केला. त्यानंतर प्रशांत पाटील याची १५ हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली.

हे सुद्धा वाचा

का दिली धमकी

आरोपी प्रशांत पाटील याने फक्त छगन भुजबळ यांना धमकी दिली नव्हती तर धनजंय मुंडे यांनाही धमकीचा फोन केला होता. तसेच दिलीप वळसे पाटील यांनाही फोन केला होता. परंतु दिलीप वळसे पाटील यांनी फोन उचलला नव्हता. प्रशांत पाटील याने दारूच्या नशेत सगळ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. त्याला महाडमधून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 1 युनिटनं अटक केली होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.