नात्यातील तरुण, एकतर्फी प्रेम, रागाच्या भरात अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार, क्षणात जीव घेतला, महाराष्ट्र हादरला
पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आलाय. तसा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा खून मुलीच्या नात्यातील व्यक्तीनेच केल्याचे सांगितले जात आहे.
पुणे : प्रेम अतिशय निखळ आणि पवित्र अशी भावना आहे. पण कधीकधी याच प्रेमाचे प्रेमाचे रुपांतर सुडामध्ये होते. सध्या असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आलाय. तसा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा खून मुलीच्या नात्यातील व्यक्तीनेच केल्याचे सांगितले जात आहे. मृत मुलगी इयत्ता आठवी वर्गामध्ये शिकत होती. सोमवारी (12 ऑक्टोबर) संध्याकाळी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली असून एकच खळबळ उडाली आहे.
मुलगी कबड्डी खेळत असताना कोयता, चाकूने वार
मिळालेल्या माहितीनुसार बिबवेवाडी परिसरात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी कबड्डी खेळत होती. यावेळी आजूबाजूला काही छोटी मुलं तसेच इतन नागरिक व्यायाम करत होते. दरम्यान, मुलगी कबड्डी खेळत असताना तिच्याच नात्यातील एका आरोपीने अन्य दोन व्यक्तींसह तिचा खून केला. तिच्यावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स येथे ही घटना घडली.
खुनाचा थरार मुलीच्या मैत्रिणींनी पाहिला
भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मुलीवर वार करत असताना हा सर्व प्रकार मुलीच्या मैत्रिणींनी व प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पाहिला आहे. कसलीही भीती न बाळगता आरोपीने मुलीची हत्या केल्यामुळे या परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत मृत्यू
दरम्यान, या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. उपचारासाठी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता
इतर बातम्या :
भयंकर ! पुण्यात आठवीच्या मुलीची हत्या, तो वार करत होता तेव्हा लहान मुलं खेळत होती, मोठे घाबरुन पळाले
सांगली, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणारा चोरटा जेरबंद, आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार
अवघ्या तीन सेकंदात तरुणाचा जीव घेतला, औरंगाबादेत कुख्यात गुन्हेगार चोवीस तासात जेरबंद
हवाई प्रवासासंदर्भात मोठा निर्णय, देशांतर्गत उड्डाणांवरील बंदी हटवली, आता विमानसेवा पूर्ण क्षमतेने चालणार#AirTravel #DomesticFlight #InternationalFlight https://t.co/x54HZGrrS8
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2021