धक्कादायक! पुण्यात सापडले स्फोटासाठी वापरले जाणारे 67 डेटोनेटर

पुण्यातील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पुण्यातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात स्फोटासाठी वापरले जाणारे 67 डेटोनेटर सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! पुण्यात सापडले स्फोटासाठी वापरले जाणारे 67 डेटोनेटर
पुण्यात सापडले स्फोटासाठी वापरले जाणारे 67 डेटोनेटर
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 7:06 PM

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यात स्फोटासाठी वापरले जाणारे 67 डेटोनेटर सापडले आहेत. पुण्याजवळील वडकीतल्या गायदरा वस्तीत 67 डेटोनेटर सापडले आहेत. अज्ञात इसमाने डेटोनेटर ठेवल्याची माहिती मिळत आहे. अज्ञात आरोपीने इलेक्ट्रिक डेटोनेटर वायरसह ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोना निर्माण झाला. सुदैवाने याबाबतची माहिती समोर आल्याने मोठा घातपातीचा कट उधळून लावण्यास पोलिसांना यश आलं आहे. पुण्याच्या लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा परिसरात तीन दहशतवाद्यांना कोथरूड येथे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडले होते. या दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा, मुळशीतील काही परिसरात आणि या गायधरा परिसरात स्फोटाचे प्रशिक्षण घेतले असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातूनच हे 67 डेटोनेटर तिथे सापडले का? याचा तपास आता पोलीस करणार आहेत. पण संबंधित प्रकरण किती भीषण आहे, याची जाणीव आता होताना दिसत आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर आता पुणे पोलिसांवरील जबाबदारी कितीतरी पटीने जास्त वाढल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

पुणे पोलिसांना दहशतवादी नेमके कसे सापडले होते?

पुणे पोलिसांनी गेल्यावर्षी जुलै महिन्यात तीन आरोपींना दुचाकी चोरीच्या संशयातून अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली तेव्हा पोलीसही चक्रावले होते. कारण त्यांच्या घरात एक जीवंत काडतुस, चार मोबाईल, एक लॅपटॉप आणि इतर कागदपत्रे आढळले होते. हे साहित्य पाहिल्यानंतर आरोपींचा देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपी हे एनआयएच्या फरार लिस्टमधील असल्याचं उघड झालं. पोलिसांनी पुढे दोन दहशतद्यांना एनआयएकडे सोपवलं.

आरोपींकडे बाँब बनवण्यासाठीचं आवश्यक साहित्य होतं, अशी माहिती नंतर समोर आली. यानंतर पुढच्या तपासात माहिती समोर आली की, आरोपींनी जंगलात बाँबची ट्रायल घेतली होती. याप्रकरणी तपास यंत्रणांचा सखोल तपास सुरु आहे. या दरम्यान आता वडकीतल्या गायदरा वस्तीत 67 डेटोनेटर सापडले आहेत. हे 67 डेटोनेटर तिथे कसे आले? याचा तपास आता पोलीस करणार आहेत.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....