पुणे जिल्ह्यात विचित्र अपघात, तीन वाहनांच्या धडकेत कारने पेट घेतली अन्…

Pune Accident | पुणे - नाशिक महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक कंटेनर बंद पडला होता. या मार्गावर सकाळी टेम्पो आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर टेम्पो पुढे उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. तर स्विफ्ट कारने पेट घेतली.

पुणे जिल्ह्यात विचित्र अपघात, तीन वाहनांच्या धडकेत कारने पेट घेतली अन्...
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 11:34 AM

मंचर, पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2024 | पुणे जिल्ह्यात पुन्हा भीषण अपघात झाला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे विचित्र अपघात झाला आहे. मंचरजवळ असलेल्या भोरवाडी येथे स्विफ्ट कार, टेम्पो आणि कंटेनरचा विचित्र अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कार जागीच जळून खाक झाली. यामुळे या गाडीतील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने कारचा चालक आणि टेम्पोचा चालक अपघातातून बचावले. मृत्यू झालेले तिघे जण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील आहेत. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कसा झाला अपघात

पुणे – नाशिक महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक कंटेनर बंद पडला होता. या मार्गावर सकाळी टेम्पो आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर टेम्पो पुढे उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. तर स्विफ्ट कारने पेट घेतली. त्यात स्विफ्ट गाडी पूर्णतः जळून खाक झाली आणि गाडीतील तिघांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

एक जण गंभीर जखमी

अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. कार‌ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अजून मिळाली नाही. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.

पहाटे झालेल्या या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. मंचर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्यावर असलेली अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. त्यानंतर पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.